नागपूर:
तनाएराचे नवे फेस्टिव्ह कलेक्शन मियारा यंदाच्या सणासुदीत दोन अंकी वृद्धीचे अनुमान
विशेष ऑफर अनोखी खरेदी योजना ग्राहकांना मिळवून देणार महिलांचा एथनिक वेयर ब्रँड टाटा परिवारातील एक सदस्य, तनाएराने प्रस्तुत केले आहे नवे फेस्टिव्ह कलेक्शन मियारा हाताने विणलेले शुद्धतेमध्ये रुजलेले हे कलेक्शन आधुनिक महिलांसाठी तयार केले आहे. आधुनिक डिझाईन पारंपरिक कला अप्रतिम विणीतून एक आगळीवेगळी डिझाईन भाषा तयार होते जी या कलेक्शनला इतरांपेक्षा वेगळे स्थान प्रदान करते. विविध प्रकारचे रेशीम सूत, विविध विणकाम परंपरा मियारा मध्ये पाहायला मिळतात. स्वतःची आवड, स्वप्ने पूर्ण करण्यासाठी असो किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीला विचारपूर्वक दिलेली भेट असो, आनंद उत्साहाचा प्रत्येक क्षण शानदार व संस्मरणीय बनावा ही यामागची भावना आहे.
वर्षातील सर्वात मोठे सण जवळ येत आहे अनुसरून तनाएराने नवे कॅम्पेन देखील तयार केले आहे, द गिफ्ट ऑफ प्युअर लव्ह सणासुदीच्या काळात साडी म्हणजे कालातीत प्रेमाचे प्रतीक असा साडीचा सन्मान या कॅम्पेनमध्ये करण्यात आला आहे. प्रियजनांना भेटवस्तू देण्यामागची आपली भावना ब्रँडने या कॅम्पेनमध्ये व्यक्त केली आहे, तनाएरा साडी म्हणजे भावनेइतकी दुर्लभ मौल्यवान, ती भेट म्हणून देणे म्हणजे प्रेमाचा सोहळा साजरे करण्यासारखे आहे याची आठवण हे कॅम्पेन करून देते. शुद्धता हेच प्रेमाचे खरे माप आहे, शुद्ध प्रेम पाहता येत नाही, ते जाणिवेतून मनाला स्पर्श करते, हा विचार हे कॅम्पेन मांडते.
प्रत्येक खरेदी हा एक अनुभव बनावा तो कायम स्मरणात राहावा यासाठी ब्रँडने विशेष फेस्टिव्ह ऑफर्स सुरु केल्या आहेत, यामध्ये गिफ्ट व्हाउचर्स गोल्ड कॉईन्स आहेत. १०,००० रुपयांच्या प्रत्येक खरेदीसोबत ग्राहकांना मिळेल १,००० रुपयांचे व्हाउचर जे पुढील खरेदीच्या वेळी रिडीम करता येईल. ५०,००० किंवा त्यापेक्षा जास्तीची रुपयांची खरेदी केल्यावर ०.२ ग्रामचे तनिष्क गोल्ड कॉईन भेट म्हणून मिळेल. मर्यादित कालावधीच्या या ऑफरचा लाभ २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत घेता येईल. देणे ही केवळ घटना बनून राहू नये, यासाठी तनाएराने गोल्डन ककून खरेदी योजना सुरु केली आहे, ग्राहकांना त्यांच्या स्वप्नातील साडी प्रत्यक्षात परिधान करण्याचे सुख मिळवता येते.
तनाएराचे नवे फेस्टिव्ह कलेक्शन मियारा
तनाएराचे नवे फेस्टिव्ह कलेक्शन मियारा यंदाच्या सणासुदीत दोन अंकी वृद्धीचे अनुमान
विशेष ऑफर अनोखी खरेदी योजना ग्राहकांना मिळवून देणार
विशेष ऑफर अनोखी खरेदी योजना ग्राहकांना मिळवून देणार