नागपूर,: गणेशोत्सवाच्या मंगलप्रसंगी नवनीत एज्युकेशन लिमिटेडच्या युवा स्टेशनरी विभागाने विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या माय बाप्पा वर्कशॉप चे देशभरातील ८०हून अधिक शाळांमध्ये आयोजन केले. या विधायक उपक्रमात युवा ने तयार केलेल्या किट्सच्या साहाय्याने विद्यार्थ्यांनी अनोख्या कलाकृती साकारत परंपरा संस्कृतीला सर्जनशीलतेची जोड देत गणेशभक्तीचा उत्सव साजरा केला.
युवा तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या माय बाप्पा वर्कशॉप या वार्षिक कार्यशाळेच्या माध्यमातून गणेशोत्सवाचा उत्साह सर्जनशीलता शिक्षणाच्या माध्यमातून जिवंत होतो. गणेशोत्सव हा युवा साठी केवळ सण नसून कल्पनाशक्ती, ज्ञान आणि एकत्रित आनंदाचा उत्सव आहे मुले या आनंदसोहळ्याचा केंद्रबिंदू असतात.
युवा चा हा उपक्रम महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, कर्नाटकसह विविध राज्यांतील ८० हून अधिक शाळांपर्यंत पोहोचला उत्सवाचा आनंद सर्वत्र द्विगुणित करण्यात आला. नागपुरात युवा ने शंकर नगरमधील सरस्वती विद्यालय, फ्रेंड्स कॉलनीतील गुरुकुल विद्या मंदिर, शुक्रवारीतील जे. एन. टाटा पारसी हायस्कूल, दीक्षाभूमी येथील कुर्वे मॉडेल पब्लिक स्कूल सीबीएसई समर्थ नगरमधील आर. एस. मुंडले इंग्लिश स्कूल यांचा सहभाग होता. देशभरातील २४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने या उपक्रमात भाग घेतला सुंदर कलाकृतींमधून गणरायाला सर्जनशील अभिवादन केले.
गणेशोत्सव निमित्त नवनीत एज्युकेशन लिमिटेड युवा तर्फे शाळांमध्ये माय बाप्पा उपक्रम
युवा च्या माय बाप्पा वर्कशॉप मुळे भारतभरातील ८०+ शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित खास तयार केलेल्या किट्सचा वापर करून विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवाला साजेशा कलाकृती साकारल्या