नागपूर,:
वोक्हार्ट हॉस्पिटल्सने 11 जुलै ते 11 ऑगस्ट 2025 दरम्यान नागपूर मुंबई सेंट्रल मीरा रोड येथील हॉस्पिटल्स आजूबाजूच्या भागांमध्ये तुमचा शेवटचा निर्णय सर्वात महान ठरू शकतो या संकल्पनेवर आधारित एक महिन्याची अवयवदान जनजागृती मोहीम यशस्वीरित्या राबवली. या मोहिमेचा उद्देश लोकांमध्ये अवयवदानाविषयी चर्चा घडवून आणणे सर्व धर्मातील लोकांमध्ये व समाजांमध्ये या विषयाबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता. या जनजागृती उपक्रमात हिंदू मुस्लिम ख्रिश्चन धर्मीय आध्यात्मिक धर्मगुरू अवयव ट्रान्सप्लांट तज्ज्ञ, अवयवदान करणाऱ्यांचे अवयव मिळवणात्यांचे कुटुंबीय यांना एकत्र आणले गेले जेणेकरून वैद्यकीय व सामाजिक दृष्टिकोनातून अंगदानाच्या संकल्पनेला सहज स्वीकारले जावे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा भाग म्हणून वोक्हार्ट हॉस्पिटल्सने धर्मगुरू ट्रान्सप्लांट क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मदतीने हा उपक्रम राबवला. यामागचा उद्देश असा होता की, अंगदान ही केवळ वैद्यकीयदृष्ट्या नव्हे तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही समर्थित असलेली एक उदात्त करुणामय कृती आहे असा स्पष्ट संदेश लोकांपर्यंत पोहोचवणे या कार्यक्रमात बोलताना हिंदू मुस्लिम ख्रिश्चन समुदायाचे आदरणीय धर्मगुरूंनी सांगितले जीवदान म्हणजे जीवन देण्याची संकल्पना जी धर्मग्रंथांमध्ये आहे. अवयवदान ही केवळ मान्य असलेली बाब नाही तर ती एक पवित्र जबाबदारी आहे. जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जगण्याची संधी देतो तेव्हा ती व्यक्ती सर्व कर्माच्या सीमा ओलांडते. ही दयाळूपणाची सर्वोच्च पातळी आहे जिथे एखाद्याचा मृत्यू दुसऱ्याच्या आशेची सुरुवात बनतो, अवयवदानाचा निर्णय घेतल्यामुळे मानवी आयुष्याला एका आध्यात्मिक प्रवासात रूपांतरित करतो. डॉ. स्वप्रिल शर्मा सिनियर लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन वोक्हार्ट हॉस्पिटल्स यांनी सांगितले भारतामध्ये अवयव न मिळाल्यामुळे दरवर्षी अनेक लोकांचा मृत्यू होतो जो टाळता येऊ शकतो. शस्त्रक्रिया टीम आयसीयू पूर्णपणे सज्ज आहे तरीही अनेकदा कुटुंबीय संकटाच्या क्षणी निर्णय घेण्यास मागे हटतात. जर जास्तीत जास्त लोकांनी जिवंतपणीच अवयवदानाची इच्छा कुटुंबीयांशी बोलून ठेवली तर मृत्यूनंतर हजारो लोकांचे जीव वाचवता येतील. आज अडचण विज्ञानात नाही तर संवादाच्या अभावामध्ये आहे. हा संवाद प्रत्येक घरात सुरू करण्याची गरज आहे. डॉ. सुर्याश्री पांडे नेफ्रॉलॉजिस्ट लिव्हर ट्रान्सप्लांट कन्सल्टन्ट वोक्हार्ट हॉस्पिटल्स यांनी सांगितले एक अवयवदाता आठ जीव वाचवू शकतो. ही एक चमत्कारांची साखळी आहे जी एका साध्या संवादातून सुरू होते. लोकांमध्ये जागरूकता वाढताना दिसत आहे, पण त्या जागरूकतेला कृतीत रूपांतरित करणे हे खरे आव्हान आहे. जीवनाशी संबंधित निर्णयांवर घरामध्ये मोकळेपणाने चर्चा करतो तशीच चर्चा अवयवदानाबाबतही व्हायला हवी. जेव्हा एखाद्यांची इच्छा आधीच माहीत असते तेव्हा नातेवाईक आत्मविश्वासाने ठामपणे त्यासाठी हो म्हणू शकतात. डॉ. पीयूष मारुडवार गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि लिव्हर ट्रान्सप्लांट कन्सल्टन्ट वोक्हार्ट हॉस्पिटल्स यांनी सांगितले कीः अंगदानाची चर्चा ही नेहमीच्या आरोग्यविषयक चर्चाचा भाग असली पाहिजे ती शेवटच्या क्षणासाठी राखून ठेवलेला भीतीचा विषय नसावा. यकृत हे अशा काही अवयवांपैकी एक आहे जे पुन्हा निर्माण होऊ शकते तरीही अनेक जीव केवळ दात्याच्या प्रतीक्षेत गमावले जातात. या विषयावर कुटुंबांमध्ये तरुणांमध्ये सुरुवातीपासूनच चर्चा झाली पाहिजे जेणेकरून अंगदान हा भीतीचा विषय नव्हे तर नैसर्गिक सकारात्मक निर्णय बनू शकतो. आज घेतलेली प्रत्येक प्रतिज्ञा कोणाच्यातरी उद्याचे आयुष्य बदलू शकते. ही मोहीम समुदाय पातळीवरील जनजागृती डिजिटल माध्यमातून कथा सांगणे या दोन टप्प्यांमध्ये राबवण्यात आली. हॉस्पिटल्स कॉर्पोरेट कार्यालये सार्वजनिक ठिकाणी क्यूआर कोड फिजिकल फॉर्मद्वारे नावनोंदणी करता येईल असे डोनर रजिस्ट्रेशन बूथ्स लावण्यात आले. हे बूब्स अनेकदा मोफत आरोग्य तपासणी शिबिरांसोबत लावले गेले
वोक्हार्ट हॉस्पिटल्स ची अवयवदान जनजागृती मोहिम
वोक्हार्ट हॉस्पिटल्स मध्ये गत 11 जुलै ते 11 ऑगस्ट 2025 या कालावधीत अवयवदान ही संकल्पना जनमानसात रुजावी यासाठी जनजागरण मोहीम हाती घेतली व देहदान काय असते याबाबत विविध माध्यम व उपक्रम द्वारे मरणोत्तर अवयव दान हे किती मोलाचे आहे त्यामुळे आपण मृत्यूच्या खाईत जाणाऱ्या रुग्णाला संजीवनी मिळते मग तो कोणत्याही धर्माचा पंथाचा असो हिंदू मुस्लिम शीख इसाई कोणी ही कोणासाठी अवयव दान करू शकतो अशी मोहीम राबविली आणि या दिवसात देहदान करनाऱ्या चे प्रमाण वाढत आहे असे डॉ . मारुडवार यांनी सांगितले