AROGYA

मिडास हॉस्पिटल, नागपूर ला अत्याधुनिक ट्रॉमा विभागाचे उद्घघा टन

Nagpur Media News • 09 Aug, 2025
मिडास हॉस्पिटल, नागपूर ला अत्याधुनिक ट्रॉमा विभागाचे उद्घघा टन
मीडास हॉस्पिटलमध्ये रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांसह प्रशस्त जागा आणि उत्कृष्ट सुविधा वाजवी दरात प्रदान करण्यात येणार आहेत.
२४/७ आपत्कालीन सेवा – अनुभवी ट्रॉमा तज्ज्ञ व नर्सेससह चौविस तास सेवा.
२४/७ आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक: 9226471834
२४/७ अ‍ॅम्ब्युलन्स सेवा
अ‍ॅडव्हान्स लाइफ सपोर्ट सिस्टम्स – व्हेंटिलेटर्स, कार्डियाक मॉनिटर्स, डिफिब्रिलेटर्स आदींनी सुसज्ज. ;
.डॉ श्रीकांत मुकेवार
नागपूर:
वैद्यकीय क्षेत्र हे सतत बदलणारे, आव्हानात्मक बौद्धिक दृष्ट्या क्लिष्ट आहे. प्रत्येक गरजवंताला वाजवी दरात अद्ययावत आरोग्यसेवा मिळावी, यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. यामध्ये समाधानकारक बाब ही की, दुर्गम भागातील रुग्णांनाही अशा प्रगत आरोग्य सुविधा सहज उपलब्ध होत आहेत.
गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी क्षेत्रात उत्कृष्टतेची परंपरा जपणाऱ्या मिडास हॉस्पिटलने कार्डिओलॉजी, नेफ्रोलॉजी, यूरोलॉजी, ऑर्थोपेडिक्स सुपर स्पेशॅलिटी सेवा सेंट्रल इंडियामधील पहिले GI (गॅस्ट्रोइंटेस्टाइनल) सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केले आहे. रुग्णांना एकाच छताखाली सर्व वैद्यकीय गरजांसाठी विश्वासार्ह सेवा मिळणार आहे.
नागपूर येथील मिडास हॉस्पिटल ला आपत्कालीन ट्रॉमा केअर युनिटचे भव्य उद्घाटन करताना खूप आनंद होतो आहे . ही एक अत्याधुनिक सुविधा आहे जी प्रगत, २४ तास ट्रॉमा आपत्कालीन सेवा प्रदान करण्यासाठी समर्पित आहे. या ऐतिहासिक उपक्रमाचे उद्घाटन अनिरुद्ध पुरी, पीआय ,नागपूर ट्रॅफिक पोलीस यांनी मान्यवर, वरिष्ठ रुग्णालय अधिकारी मेडिकल प्रोफेशनल्स यांच्या उपस्थितीत केले.
Previous Story Next Story