AROGYA

मॅक्स हॉस्पिटल ला सजीव अवयव दान रोबोटिक प्रत्यारोपन शस्त्रक्रिया यशस्वी

Nagpur Media News 02 Aug, 2025
मॅक्स हॉस्पिटल ला सजीव अवयव दान रोबोटिक प्रत्यारोपन शस्त्रक्रिया यशस्वी
मॅक्स हॉस्पिटल, नागपूर येथील डॉक्टरांनी दोन रुग्णांना जीवनदान दिले सजीव अवयवदान रोबोटिक प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी
नागपूर: प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमध्ये एक महत्त्वपूर्ण प्रगती साधत, मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर येथील डॉक्टरांनी प्रगत रोबोटिक शस्त्रक्रिया तंत्रज्ञानाचा वापर करून यशस्वीरित्या यकृत व मूत्रपिंड दान शस्त्रक्रिया पार पाडली आहे, ज्यामुळे शहरात प्रत्यारोपण प्रक्रियेसाठी नवीन मानदंड प्रस्थापित झाला आहे.
रोबोटच्या साहाय्याने केलेल्या शस्त्रक्रियेमुळे पारंपरिक शस्त्रक्रियांच्या तुलनेत लहान छेद पडतात, रक्तस्राव कमी होतो, गुंतागुंत कमी होते रुग्ण लवकर बरे होतो. अवयवदात्यांसाठी ही प्रक्रिया सुरक्षित ठरते.
या शस्त्रक्रिया दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये पार पडल्या रोबोटिक डोनर हेपेटेक्टॉमी डॉ. राजविलास नरखेडे यांनी केली, तर रोबोटिक डोनर नेफ्रेक्टॉमी डॉ. जुनेद शेख डॉ. संजय कोलते यांनी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर येथे केली.
४० वर्षीय अंकुश गौरकर, चंद्रपूरचे रहिवासी, गेल्या दोन वर्षांपासून अज्ञात कारणामुळे यकृताच्या गंभीर आजाराने त्रस्त होते. स्थानिक रुग्णालयात सखोल तपासणीनंतर त्यांना तीव्र-दीर्घकालीन यकृत विकार असल्याचे निदान झाले. विशेषज्ञ सल्ला उशिरा घेतल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर येथे पाठवण्यात आले. तपासणीनंतर यकृत प्रत्यारोपणाची गरज असल्याचे स्पष्ट झाले. त्यांची पत्नी, ३६ वर्षीय भाग्यश्री खांगर, यांनी आपल्या यकृताचा एक भाग दान करण्याचा निर्णय घेतला.
या प्रकरणाबद्दल माहिती देताना, डॉ.राजविलास नरखेडे, प्रिन्सिपल कन्सल्टंट – लिव्हर ट्रान्सप्लांट व बायलीअरी सर्जरी, मॅक्स हॉस्पिटल, नागपूर, म्हणाले, संपूर्ण मूल्यांकनानंतर, डोनरवर रोबोटिक-सहाय्यित उजव्या लोबचे यकृत काढण्याची शस्त्रक्रिया सात तासांत यशस्वीरित्या पार पाडली. नंतर यकृताचा भाग प्राप्तकर्त्याला प्रत्यारोपित करण्यात आला, ज्यासाठी आठ तासांची शस्त्रक्रिया झाली. दोन्ही प्रक्रिया कोणत्याही गुंतागुंतीशिवाय पूर्ण करण्यात आल्या. शस्त्रक्रियेनंतर डोनरला पाचव्या दिवशी आणि प्राप्तकर्त्याला बाराव्या दिवशी स्थिर स्थितीत रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
Previous Story Next Story