AROGYA

स्माईल ट्रेन इंडिया बजाज व फिनसर्व याच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हॉस्पिटल येथे महा स्माईल्स उपक्रम

Nagpur Media News 01 Aug, 2025
स्माईल ट्रेन इंडिया  बजाज व फिनसर्व याच्या संयुक्त विद्यमाने  स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हॉस्पिटल येथे महा स्माईल्स उपक्रम
स्माईल ट्रेन इंडिया आणि बजाज फिनसर्व CSR यांच्यातर्फे
महा स्माईल्स चे विदर्भात क्लेफ्ट जनजागृती अभियान सुरू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीने समर्थित, चेहऱ्यावरील विवर (क्लेफ्ट) व तालू शस्त्रक्रियांसाठी लवकर निदान व उपचाराविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी ९० दिवसांचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
नागपूर, : देशातील अग्रगण्य क्लेफ्ट-संबंधित स्वयंसेवी संस्था स्माईल ट्रेन इंडिया बजाज फिनसर्व CSR यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भातील दुर्लक्षित भागांमध्ये उपचारासाठीचा दुवा निर्माण करण्याच्या उद्देशाने महा स्माईल्स क्लेफ्ट जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. या ९० दिवसांच्या विशेष उपक्रमाचा शुभारंभ आज नागपूर येथील स्माईल ट्रेनचे भागीदार रुग्णालय – स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हॉस्पिटल येथे डॉक्टर्स, सरकारी अधिकारी बजाज फिनसर्व व स्माईल ट्रेनच्या नेतृत्व मंडळाच्या उपस्थितीत करण्यात आला.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री . देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमास पाठिंबा दर्शवत, विदर्भातील गरजू मुलांसाठी क्लेफ्ट उपचार सहज उपलब्ध करून देण्याचे आपले व्हिजन शेअर केले.
या कार्यक्रमात एलईडी स्क्रीनने सज्ज अशा तीन व्हॅन्सना झेंडा दाखवण्यात आला, ज्या अकोला, नागपूर व वर्धा विभागातील ग्रामीण भागात फिरणार आहेत. या व्हॅन्समध्ये ऑडिओ-व्हिज्युअल साधने संवादात्मक प्लॅटफॉर्म्स असतील, ज्यामधून स्थानिक समुदायांमध्ये क्लेफ्ट म्हणजे काय त्यावर लवकर हस्तक्षेप व शस्त्रक्रियेद्वारे उपचार शक्य आहे हे समजावून सांगण्यात येईल. याशिवाय, या व्हॅन्समधून परिसरातील मोफत उपचारासाठी टोल-फ्री क्रमांक 1800 103 8301 वर संपर्क करण्याचे मार्गदर्शन दिले जाईल. दक्षिण आशियासाठी
Previous Story Next Story