RAJKIYA

पुढील चार वर्षात देशातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करू,: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

Nagpur Media News 28 Jul, 2025
पुढील चार वर्षात देशातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करू,: मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस*
भाजप चे वरिष्ठ नेते माजी नगरसेवक प्रभाकर येवले याच्या पुढाकाराने स्व. भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घघाटन समारोह केंदीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालक मंत्री बावनकुळे याचे हस्ते पार पडले उत्तर नागपुरातील लष्करीबाग येथे भव्य सेंटर उभारण्यात आले 8 महिन्या अगोदर भूमिपूजन झाले होते ही जमीन विजयी भारत संस्थाची होती प्रभाकर येवले संस्थेचे पदाधिकारी आहेत त्यांनी ही जमीन भानू ताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेला एन आय टी च्या मांध्य मातून हस्तांतरित केली व सेंटर पूर्णत्वास आले
उत्तर नागपूर नव्हे तर पश्चिम पूर्व मध्य नागपूर मधील नागरिकांना लाभ होणार आहे अगदी माफक दरात सर्व प्रकारच्या चाचण्या तपासण्या एम आर आय होणार आहे याप्रसंगी प्रभाकर येवले याचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी उत्तर नागपूर भाजप नेते कार्यकर्ते गणेश कानतोडे संजय चौधरी प्रमिला मतराणी दिलीप गौर माजी आमदार मिलिंद माने ओमप्रकाश इंगळे व विशेष म्हणजे प्रभाकर येवले याच्या अथक परिश्रम ने कार्यक्रम पूर्णत्वास आला हजारो नागरिक महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या
नागपूर,: प्राथमिक आरोग्य सुविधांच्या दृष्टीने प्रत्येक तीन किलोमीटरमध्ये आरोग्यसेवांचे जाळे निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या चार वर्षांत देशातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांचाही सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. येत्या काळात सिकलसेल, थॅलेसिमिया, ॲनिमियावरील महागड्या उपचारासाठी एक नवीन योजना तयार करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
लष्करीबाग येथील कमाल चौकात स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेद्वारा संचालित स्व. भानुताई गडकरी मोमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी अध्यक्षस्थानी तर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्ष कांचन ताई गडकरी यांची विशेष उपस्थिती होती.
आमदार संदीप जोशी, आमदार प्रवीण दटके, आमदार आशीष देशमुख, बेंगलुरू येथील महाबोधी सोसायटीचे महासचिव पुज्य भंते आनंद थेरा, नागपूर येथील रामकृष्ण मठाचे अध्यक्ष राघवेंद्र स्वामी, माजी मंत्री अॅड. सुलेखा कुंभारे, राजेश लोया, विशाखापट्टणम येथील एएमटीझेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जितेंद्र शर्मा,माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी आमदार गिरीश व्यास, माजी आमदार टेकचंद सावरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
Previous Story Next Story