UDYOJAGTA

मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या हैदराबादमधील एकात्मिक उत्पादन

Nagpur Media News 09 Jul, 2025
मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या हैदराबादमधील एकात्मिक उत्पादन
मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या हैदराबादमधील एकात्मिक उत्पादन
सुविधेचे उद्घाटन
३.४५ लाख चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेली ही एकात्मिक सुविधा, सोने शुद्धीकरण, आभूषण रचना दागिने निर्मिती एकाच छताखाली आणून जागतिक अग्रणी उत्पादक म्हणून स्थान मजबूत करेल
२,७५० हून अधिक कारागीर अत्याधुनिक तंत्रज्ञान संशोधन व विकासाच्या समर्थनासह, ही सुविधा मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या जागतिक किरकोळ विस्ताराला चालना देईल वर्षाकाठी ४.७ टन सोन्याचे दागिने आणि १.८ लाख कॅरेट हिऱ्यांचे दागिने तयार करण्याची सुविधेची क्षमता
मुंबई,
: जगभरात १३ देशांमध्ये ४०० हून अधिक विक्री दालनांसह जागतिक स्तरावरील पाचव्या क्रमांकाची दागिने विक्रेते असलेल्या, मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने तेलंगणातील हैदराबाद येथे अत्याधुनिक, पूर्णपणे एकात्मिक प्रकारातील दागिने उत्पादन सुविधा सुरू केली आहे. रंगा रेड्डी जिल्ह्यातील महेश्वरम येथील जनरल पार्क येथे स्थित ३.४५ लाख चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेले हे अशा प्रकारचे पहिले एकात्मिक उत्पादन केंद्र आहे, जे भारत आखाती देशांमध्ये समूहाच्या कार्यरत असलेल्या १४ उत्पादन सुविधांमध्ये आहे.
एकात्मिक उत्पादन सुविधेमुळे आभूषण रचना, सोने शुद्धीकरण, दागिने निर्मिती, गुणवत्ता हमी, हॉलमार्किंग, वेअरहाऊसिंग पुरवठा साखळी व्यवस्थापन यासारखी सर्व महत्त्वाची कार्य एकाच छताखाली आणली गेली आहेत. या केंद्राची वार्षिक उत्पादन क्षमता ४.७ टनांहून अधिक सोन्याचे दागिने १.८ लाख कॅरेट हिऱ्यांचे दागिने निर्मितीची आहे वार्षिक सोन्याची शुद्धीकरण क्षमता ७८ टन आहे. १८ राज्यांमधून २,७५० हून अधिक कुशल कारागिरांना रोजगार संधी या केंद्राने दिल्या असून, कर्मचाऱ्यांची सुरक्षितता, कल्याण सोयही सुनिश्चित केली आहे. या सुविधेमधील ४० टक्के कर्मचारी हे स्थानिक परिसरांतून भरती केले गेले आहे एकूण पुरुष-महिला गुणोत्तर ८० मागे २० असे राखले गेले आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या नवीन जनरल पार्क सुविधेचे अधिकृत उद्घाटन मलाबार समूहाचे अध्यक्ष श्री एम.पी. अहमद; उपाध्यक्ष अब्दुल सलाम के.पी; मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या भारतातील कारभाराचे व्यवस्थापकीय संचालक आशर ओ; कार्यकारी संचालक निषाद ए.के. यांच्या उपस्थितीत मलाबार समूहाचे इतर वरिष्ठ व्यवस्थापकीय संघातील सदस्य, तेलंगणा सरकारमधील हितचिंतक यांच्या उपस्थितीत केले.
Previous Story Next Story