AROGYA

श्वसन आजाराने त्रस्त 53 वर्षीय महिलेवर व्होकार्ट हॉस्पिटल ची यशस्वी निदान व उपचार

Nagpur Media News 26 Jun, 2025
श्वसन आजाराने त्रस्त 53 वर्षीय महिलेवर  व्होकार्ट हॉस्पिटल ची यशस्वी निदान व उपचार
तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने 53 वर्षीय महिलेवर जीवन वाचवणारी यशस्वी शस्त्रक्रिया केली गंभीर श्वसनमार्ग अडथळ्याच्या प्रकरणात यश
नागपूर, ;
चंद्रपूरच्या 53 वर्षीय महिलेला गंभीर स्थितीत वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर येथे दाखल करण्यात आले होते. छातीत मोठा ट्युमर आढळून आला होता जो श्वासनलिका (ट्रॅकिया)वर दाब देत होता, फुफ्फुस पूर्णपणे बंद झाले होते दुसरे जवळपास पूर्णपणे बंद होण्याच्या स्थितीत होते. महिला 10 दिवसांपासून तीव्र श्वास घेण्यास त्रास, खोकला व छातीत दुखणे यासारख्या त्रासांनी पीडित होती. तिची प्रकृती 2 जून 2025 रोजी अधिकच बिघडली. सुरुवातीला वरोरा येथील रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तिच्या डाव्या वोकल कॉर्डचे पक्षाघात झाले असल्याचे निदान झाले. तिचा श्वास घेण्याचा त्रास झपाट्याने वाढल्यामुळे इंट्युबेट करून तातडीने वॉकहार्ट हॉस्पिटल, नागपूर येथे हलवण्यात आले.
वोक्हार्ट येथे तपासणी दरम्यान, सीटी स्कॅन डायग्नोस्टिक ब्रॉन्कोस्कोपी करण्यात आली, ज्यामध्ये छातीच्या मध्यभागी (मीडियास्टिनममध्ये) गाठ आढळून आली
Previous Story Next Story