UDYOJAGTA

इसुझू मोटर्स इंडियातर्फे देशभरात आय केअर मान्सून सर्व्हिस कॅम्प चे आयोजन

Nagpur Media News 15 Jun, 2025
इसुझू मोटर्स इंडियातर्फे देशभरात आय केअर मान्सून सर्व्हिस कॅम्प चे  आयोजन
इसुझू मोटर्स इंडियातर्फे देशभरात आय-केअर मान्सून सर्व्हिस कॅम्प’चे आयोजन
ग्राहक 16 ते 21 जून 2025 या कालावधीत सर्व इसुझू अधिकृत डीलर सेवा केंद्रांमध्ये आकर्षक सेवा लाभ घेऊ शकतात.
नागपूर:
इसुझूची सेवा ओनरशिपचा अनुभव उत्कृष्ट ठेवण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग म्हणून, इसुझू मोटर्स इंडिया देशभरात इसुझू आय-केअर मान्सून कॅम्प चे आयोजन करणार आहे. इसुझू डी-मॅक्स पिकअप्स एसयूव्ही श्रेणीसाठी असलेल्या या कॅम्पद्वारे, ग्राहकांना आकर्षक लाभ प्रतिबंधात्मक देखभाल तपासणी उपलब्ध आहे, जेणेकरून देशभरात या पावसाळ्यात विना-अडथळा ड्रायव्हिंगचा अनुभव मिळेल.
इसुझू केअर या उपक्रमाअंतर्गत हा मान्सून कॅम्प 16 ते 21 जून 2025 या कालावधीत (दोन्ही दिवस धरून) सर्व इसुझू अधिकृत डीलर सेवा केंद्रांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या कालावधीत ग्राहकांना वाहनांसाठी खास ऑफर्स फायदे मिळू शकतील.
हा मान्सून कॅम्प देशभरातील सर्व इसुझू अधिकृत सेवा केंद्रांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. अहिल्यानगर, अहमदाबाद, अंबिकापूर, बेंगळुरू, बरेली, बाडमेर, बठिंडा, भांडूप, भोपाळ, भुवनेश्वर, बिकानेर, बिलासपूर, कालिकत, छत्रपती संभाजीनगर, चेन्नई, कोईम्बतूर, दिब्रूगढ, दीमापूर, दुर्गापूर, एर्नाकुलम, गांधीधाम, गोरखपूर, गुरगाव, गुवाहाटी, हिसार, हावडा, हुबळी, हैदराबाद, इंदूर, इटानगर, जयगाव, जयपूर, जालंधर, जम्मू, जोधपूर, कडप्पा, करनाल, खम्मम, कोल्हापूर, कोलकाता, कोट्टायम, कुर्नूल, लेह, लखनऊ, लुधियाना, मदुराई, मंडी, मंगळुरू, मेहसाणा, मोहाली, म्हैसूर, नागपूर, नाशिक, नेल्लूर, नेरुळ, नवी दिल्ली, नोएडा, पाटणा, पुणे, रायपूर, राजमुंद्री, राजकोट, रत्नागिरी, सातारा, शिवमोग्गा, सीकर, सिलिगुडी, सोलापूर, श्रीनगर, सूरत, त्रिशूर, तिरुनेलवेली, तिरुपती, त्रिची, तिरुअनंतपुरम, वडोदरा, विजयवाडा आणि विशाखापट्टणम.
Previous Story Next Story