SHAISHNIK

अविनाश गेहलोत यांच्या प्रमुख उपस्थितीत आयसीएसआय वेस्टर्न रिजन दीक्षांत समारंभ पार पडला

Nagpur Media News 12 Jun, 2025
अविनाश गेहलोत यांच्या प्रमुख उपस्थितीत  आयसीएसआय वेस्टर्न रिजन दीक्षांत समारंभ पार पडला
राजस्थान सरकारचे सामाजिक न्याय सक्षमीकरण मंत्री, अविनाश गेहलोत यांच्या प्रमुख उपस्थितीत आयसीएसआय वेस्टर्न रिजन दीक्षांत समारंभ पार पडला
नागपूर:
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (आयसीएसआय) ने वेस्टर्न रिजनसाठीचा दीक्षांत समारंभ 11 जून 2025 रोजी नागपूर येथे आयोजित केला. या समारंभात सुमारे 380 तरुण सदस्यांचा सहभाग होता.
राजस्थान सरकारचे सामाजिक न्याय सक्षमीकरण मंत्री, अविनाश गेहलोत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून समारंभाची शोभा वाढवली.
नवीन सदस्यांचे अभिनंदन करताना गेहलोत म्हणाले, कंपनी सेक्रेटरी हे कॉर्पोरेट क्षेत्रातील नैतिक आधारस्तंभ आहेत. सत्य बोला, धर्म पाळा हे मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करताना सदैव लक्षात ठेवा. भविष्यातील वाटचाल ही हेतू कठोर परिश्रमांवर अवलंबून असते. उत्कृष्ट व्यावसायिक होण्याचा प्रयत्न करा सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न करा.
विद्यार्थ्यांना संबोधित करताना, आयसीएसआयचे अध्यक्ष सीएस धनंजय शुक्ला, यांनी नवीन सदस्यांना संधी स्वीकारण्याचे या व्यवसाय तसेच आयसीएसआय संस्थेबाबत आपली जबाबदारी समजून घेण्याचे आवाहन केले. त्यांनी नमूद केले की आयसीएसआय आज जागतिक पातळीवर उत्तम गव्हर्नन्सचा प्रचार करणारी अग्रगण्य संस्था बनली आहे.
आयसीएसआय अध्यक्षांनी भारतीय सशस्त्र सेना, निमलष्करी दल, अग्निवीर, शहीदांच्या कुटुंबीयांसाठी भारतीय सशस्त्र सेना व निमलष्करी दलातील जवानांच्या पाल्यांसाठी सीएस एक्झिक्युटिव्ह प्रोग्राममध्ये नोंदणीसाठी सुरू केलेल्या शुल्कमाफी योजनेबाबत माहिती दिली. जम्मू काश्मीर, लडाख येथील विद्यार्थ्यांसाठी सीएसईईटी सीएस एक्झिक्युटिव्ह कार्यक्रमात नोंदणीसाठी उपलब्ध असलेल्या योजनांबाबतही सांगितले.
Previous Story Next Story