नागपूर,:
ब्रेन ट्युमरबाबत अद्याप टीव्हीही पुरेशी जागरूकता नाही. निदान उशिरा होऊन उपचारात अडथळा येतो. ब्रेन ट्युमरच्या रुग्णांची वाढती संख्या बघता जनजागृती आवश्यक असल्याचे मत वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर येथील ब्रेन ट्युमर सर्जरी स्पेशालिस्ट टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे न्यूरो-ऑन्कोलॉजी फेलोशिपधारक डॉ. कार्तिक मुलतानी यांनी व्यक्त केले आहे.
सतत डोकेदुखी, उलटी होणे, झटके येणे, दृष्टी कमजोर होणे, बोलताना तोंड अडखळणे, हातापायात कमजोरी जाणवणे यांसारखी लक्षणे अनेकदा सामान्य समजून दुर्लक्षित केली जातात. परंतु ट्युमर सौम्य असो की गंभीर, वेळीच निदान झाले तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेली शस्त्रक्रिया यशस्वी ठरू शकते.
ब्रेन ट्युमरची लक्षणे इतर सामान्य आजारांसारखी वाटत असल्याने रुग्ण वेळेवर डॉक्टरांकडे जात नाहीत. वारंवार होणारी डोकेदुखी, अकारण येणाऱ्या उलट्या, झटके, स्वभावात बदल, बोलण्यात बदल, अडखळणं किंवा शरीराचा तोल जाणं ही लक्षणे दिसल्यास एमआरआय करून न्यूरोसर्जनचा सल्ला घेणे आवश्यक असल्याची माहिती वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूरतर्फे देण्यात आली.
ब्रेन ट्युमरच्या रुग्णांची वाढती संख्या बघता जनजागृती आवश्यक
ब्रेन ट्युमरच्या रुग्णांची वाढती संख्या बघता जनजागृती आवश्यक
रुग्णांची वाढती संख्या बघता जनजागृती आवश्यक असल्याचे मत वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर येथील ब्रेन ट्युमर सर्जरी स्पेशालिस्ट टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे न्यूरो-ऑन्कोलॉजी फेलोशिपधारक
,:डॉ. कार्तिक मुलतानी
रुग्णांची वाढती संख्या बघता जनजागृती आवश्यक असल्याचे मत वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर येथील ब्रेन ट्युमर सर्जरी स्पेशालिस्ट टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे न्यूरो-ऑन्कोलॉजी फेलोशिपधारक
,:डॉ. कार्तिक मुलतानी