SHAISHNIK

केंब्रिज विद्यापीठात जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त अभ्यासक्रम

Nagpur Media News 04 Jun, 2025
केंब्रिज विद्यापीठात जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त अभ्यासक्रम
केम्ब्रिजने यापूर्वी जाहीर केले होते की, मार्च २०२६ पासून चेकपॉईंट परीक्षांची सिरीज सुरू करण्यात येणार आहे, जी भारतीय शैक्षणिक वेळापत्रकाशी अधिक सुसंगत असेल आंतरराष्ट्रीय मानांकनाच्या निकषांशी जुळणारी असेल.
या परीक्षा सिरीजमध्ये ८५००० च्या जवळपास प्रवेश नोंदवले गेले, ही भारतातील आतापर्यंतची मार्च सिरीज ठरली असून, मागील वर्षाच्या तुलनेत ११% वाढ दर्शवते.
नागपूर:
केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अ‍ॅण्ड असेसमेंट मधील आंतरराष्ट्रीय शिक्षण विभागाने आज भारतातील मार्च २०२५ परीक्षांच्या सिरीजचे निकाल जाहीर केले. या परीक्षांमध्ये देशभरातील ४२० शाळांमधील १७००० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. भारतीय शैक्षणिक वर्षाशी सुसंगत असलेल्या भारतात परदेशात शैक्षणिक प्रगतीसाठी उपयुक्त असणाऱ्या मार्च सिरीज मध्ये पूर्वीपेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षा देण्याचा पर्याय निवडत आहेत. केम्ब्रिजने यापूर्वी जाहीर केले होते की, मार्च २०२६ पासून चेकपॉईंट परीक्षांची सिरीज सुरू करण्यात येणार आहे, जी भारतीय शैक्षणिक वेळापत्रकाशी अधिक सुसंगत असेल आंतरराष्ट्रीय मानांकनाच्या निकषांशी जुळणारी असेल.या परीक्षा सिरीजमध्ये ८५००० च्या जवळपास प्रवेश नोंदवले गेले, ही भारतातील आतापर्यंतची मार्च सिरीज ठरली असून, मागील वर्षाच्या तुलनेत ११% वाढ दर्शवते. केम्ब्रिज आयजीसीएसइ मध्ये ६२००० हून अधिक प्रवेशांसह १२% वाढ झाली आहे, केम्ब्रिज इंटरनॅशनल ए एस आणि ए लेव्हल मध्ये २०००० हून अधिक प्रवेशांसह १०% वाढ नोंदवली गेली आहे. ही वाढ भारतातील विद्यार्थ्यांना मार्च सिरीजद्वारे मिळणाऱ्या लवचिकतेचा पर्यायांच्या वाढीव संधींचा प्रत्यय देते
Previous Story Next Story