AROGYA

एसएमएचआरसी देशपातळीवर प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेसाठी एक नवा मानक

Nagpur Media News 04 Jun, 2025
एसएमएचआरसी देशपातळीवर प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेसाठी एक नवा मानक
शासकीय व कॉर्पोरेट क्षेत्रासाठी प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपचे प्रीमियर हब म्हजीणून उदयास आले एसएमएचआरसी
उद्याच्या आरोग्यासाठी प्रिव्हेंटिव्ह पावरहाऊस
नागपूर, वानाडोंगरी 1020 खाटांचे शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एसएमएचआरसी शासकीय व खाजगी कॉर्पोरेट क्षेत्रात प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीसाठी प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप एक सर्वोत्तम पर्याय म्हणून फारच कमी वेळात महत्वाचे स्थान मिळवले आहे
नागपूर:
शासकीय व कॉर्पोरेट क्षेत्रासाठी प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपचे प्रीमियर हब म्हजीणून उदयास आले एसएमएचआरसी
उद्याच्या आरोग्यासाठी प्रिव्हेंटिव्ह पावरहाऊस
नागपूर, वानाडोंगरी 1020 खाटांचे शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एसएमएचआरसी शासकीय व खाजगी कॉर्पोरेट क्षेत्रात प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीसाठी प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप सर्वोत्तम पर्याय म्हणून फारच कमी वेळात महत्वाचे स्थान मिळवले आहे. लवकर निदान व आरोग्य देखरेख यामध्ये नवीन मापदंड प्रस्थापित करत हे केंद्र अग्रगण्य ठरत आहे.राज्याचा विश्वास पोलीस व नागरी सेवांसाठी एसएमएचआरसीची निवड एसएमएचआरसीच्या प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप प्रोग्रॅम पीएचसीपी ला महाराष्ट्र शासनाकडून मोठा प्रकल्प मिळाला होता, ज्यामध्ये नागपूर शहर पोलीस दलातील 7,500 हून अधिक कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यानंतर राज्यभरातील आयएएस, आयपीएस आयएफएस अधिकारी देखील वार्षिक आरोग्य तपासणीसाठी एसएमएचआरसीची निवड करू लागले.
हॉस्पिटलसह शिक्षण संस्था टिचिंग हॉस्पिटल्स असल्याने सुरुवातीला काही शंका व्यक्त करण्यात आल्या असल्या तरी, वैयक्तिक काळजी, जलद सेवा व कार्यक्षम प्रणालीमुळे एसएमएचआरसी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी ठरले. या अधिकाऱ्यांच्या सकारात्मक अनुभवामुळे इतर शासकीय विभाग तसेच खासगी कंपन्यांनी देखील या केंद्राची निवड करायला सुरुवात केली.
नवीन शिखरे गाठताना संस्थेसोबत कॉर्पोरेट व शासकीय संस्था जोडल्या जात आहेत
एसएमएचआरसीच्या व्यापक सुविधा व कार्यक्षम व्यवस्थापनामुळे अनेक नामांकित संस्था जोडल्या जात आहेत. बहुतांश कॉर्पोरेट रुग्णालये मर्यादित संख्येमध्ये तपासणी प्रकरणे हाताळू शकतात, परंतु एसएमएचआरसी मध्ये मल्टी स्पेशालिटी डिपार्टमेंट, 24x7 डॉक्टरांची उपलब्धता मजबूत प्रशासकीय यंत्रणा असल्यामुळे एकाच दिवशी सर्व तपासण्या शक्य होतात.
आज एसएमएचआरसीच्या सेवा घेणाऱ्या प्रमुख संस्थांमध्ये महाराष्ट्र शासन, एमएसईटीसीएल महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी एमएसआरडीसी, एचडीएफसी, अदानी पावर, टाटा ग्रुप, मेडीबडी, अशोक लेलँड, एल्स्टोम, टेक महिंद्रा यांसारख्या खाजगी कंपन्यांचा समावेश आहे.
एमएसईटीसीएल सोबत एक्झिक्युटिव्ह वेलनेस प्रोग्रॅम
नवीन भागीदारीअंतर्गत, एमएसईटीसीएल ने 40 वर्षांवरील कर्मचाऱ्यांसाठी वयोमानानुसार प्रिव्हेंटिव्ह हेल्थ पॅकेजेस पीएचपी साठी एसएमएचआरसी सोबत करार केला आहे. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा वर्धा विभागांतील 125 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत या कार्यक्रमाचा लाभ घेतला आहे.
हे पॅकेजेस जीवनशैलीशी संबंधित आरोग्यधोके लक्षात घेऊन, संबंधित कर्मचाऱ्यांच्या गरजेनुसार बनविण्यात आले आहेत.
पीएचपी टीमकडून अखंड सेवा अचूक अंमलबजावणी
ही संपूर्ण मोहीम डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुपरस्पेशालिटी ब्लॉक येथील स्वतंत्र पीएचपी विभागामार्फत राबवली जात आहे. याचे प्रशासन डॉ. नूरूल अमीन यांच्याकडे असून, सीएमएस डॉ. वसंत गावंडे वएएमएस डॉ. सुधीर सिंग यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. या अनुभवी टीममध्ये डॉ. अनिरुद्ध चक्रवर्ती पीएचपी फिजिशियन . पवन चापले फ्लोअर मॅनेजर . चेतन लांजेवार नोंदणी व बिलिंग मॅनेजर,. प्रफुल्ल धाबेकर रेडिओलॉजी मॅनेजर राखी ठावकारसीसीएल मॅनेजर. भाग्यश्री पोहानेओपीडी मॅनेजर मनाली फिजिशियन असिस्टंट,सिस्टर नम्रता ओपीडी नर्स यांचा समावेश आहे.
ही टीम तपासणी प्रक्रियेत कोणताही अडथळा न येऊ देता, रुग्णाभिमुख सेवा व वेळेवर प्रक्रिया यांची हमी देते.
Previous Story Next Story