AROGYA

भारतातील पहिली टोटल एन्डोस्कोपिक माइट्रल व्हॉल्व रिप्लेसमेंट सर्जरी शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर वानाडोंगरी, ला

Nagpur Media News 31 May, 2025
भारतातील पहिली टोटल एन्डोस्कोपिक माइट्रल व्हॉल्व रिप्लेसमेंट सर्जरी शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर वानाडोंगरी, ला
शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर वानाडोंगरी, नागपूर मध्य भारतातील पहिली टोटल एन्डोस्कोपिक माइट्रल व्हॉल्व रिप्लेसमेंट सर्जरी यशस्वीपणे पार पडली
मध्य भारतातील हृदयविकार उपचारांमध्ये एक ऐतिहासिक टप्पा गाठत, वानाडोंगरी स्थित 1020 बेडेड शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एसएमएचआरसीयेथे दिनांक 21 मे 2025 रोजी मध्य भारतातील पहिली टोटल एन्डोस्कोपिक माइट्रल व्हॉल्व रिप्लेसमेंट सर्जरी यशस्वीरित्या पार पडली
नागपूर:
शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर वानाडोंगरी, नागपूर येथे मध्य भारतातील पहिली टोटल एन्डोस्कोपिक माइट्रल व्हॉल्व रिप्लेसमेंट सर्जरी यशस्वीपणे पार पडली
मध्य भारतातील हृदयविकार उपचारांमध्ये एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नागपूर येथील वानाडोंगरी स्थित 1020 बेडेड शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एसएमएचआरसीयेथे दिनांक 21 मे 2025 रोजी मध्य भारतातील पहिली टोटल एन्डोस्कोपिक माइट्रल व्हॉल्व रिप्लेसमेंट सर्जरी यशस्वीरित्या पार पडली. ही ऍडव्हान्स मिनिमलि इन्व्हिसिव्ह शस्त्रक्रिया डॉ. सुम्बुल सिद्दिकी व त कार्डियोव्हॅस्क्युलर थोरासिक सर्जरी सीव्हीटीएस टीमने पार पाडली, जी प्रदेशातील हृदयशस्त्रक्रिया कौशल्यांमधील एक महत्त्वपूर्ण यश आहे. संस्थेच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.
ही केवळ तांत्रिकदृष्ट्या मिळालेल्या यशाची गोष्ट नाही . बांधिलकी दर्शवणारी यशोगाथा आहे, असे डीएमआयएचईआर डीयू चे ऑफकॅम्पस संचालक डॉ. अनुप मरार यांनी सांगितले. एसएमएचआरसीमध्ये आम्ही फक्त प्रगत उपचार उपलब्ध करून देत नाही, तर ते सहज, परवडणारे रुग्ण-केंद्रित असावेत यासाठी प्रयत्न करतो. या शस्त्रक्रियेस केवळ शस्त्रक्रिया कौशल्य नव्हे तर अनेक शाखांमधील समन्वय, तांत्रिक अचूकता अमोघ मानवी करुणा यांची गरज होती टीमने सर्वच पातळ्यांवर उत्कृष्ट कामगिरी बजावली,
टोटल एन्डोस्कोपिक माइट्रल व्हॉल्व रिप्लेसमेंट सर्जरी ही एक अत्यंत स्पेशलाईझ मिनिमलि इन्व्हिसिव्ह शस्त्रक्रिया आहे जी रोबोटिक तंत्रज्ञानाइतकी अचूकता देते, परंतु त्यासाठी सर्जनच्या हातातील कौशल्य, अनुभव सर्जरी करताना डोळे हातांचा अचूक समन्वय अत्यंत महत्त्वाचा असतो. छातीमध्ये मोठ्या चिरा न मारता ही प्रक्रिया रुग्णांना कमी वेदना, कमी जखमा लवकर बरे होण्याचा मार्ग देते. ही केवळ एक शस्त्रक्रिया नव्हती; ही अनेक विभागांच्या एकत्रित कार्यक्षमतेची चुणूक होती, ज्याने हृदयविकार उपचारांमध्ये नवीन मापदंड निर्माण केला,असे डॉ. मरार म्हणाले.
प्रकरणाबद्दल सांगताना सीव्हीटीएस सर्जन इन्चार्ज डॉ. सुम्बुल सिद्दिकी म्हणालया, आलेली उमरेड येथील 40 वर्षीय महिला रुग्ण होती तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. हृदयाची धडधड जाणवत होती. तिला पूर्वी क्रोनिक रूमॅटिक हार्ट डिसीज होता, ती एट्रियल फिब्रिलेशनमध्ये होती याआधी तिने बलून माइट्रल व्हाल्वोटॉमी करून घेतली होती.इकोकार्डिओग्राम अहवालात तिला गंभीर माइट्रल स्टेनोसिस,माईल्ड ऑरटिक रिगर्जीटेशन, ग्लोबल लेफ्ट व्हेंट्रीक्युलर हायपोकाइनेशिया कमी झालेला इजेक्शन फ्रॅक्शन आढळून आला ज्यामुळे ती एक अतिजोखीम असलेली रुग्ण होती. तिला रुग्णालयात मेडिकल आयसीयूमध्ये दाखल केल्यानंतर, डॉ. हेमंत देशपांडे आयसीयू तसेच इंटेसिव्हिस्ट टीम, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अभय तिडके व डॉ. राहुल बडाई यांच्या मार्गदर्शनाखाली तिची प्रकृती स्थिर करण्यात आली. सर्व वैद्यकीय मूल्यांकन केल्यानंतर आम्ही त्यांना टोटल एन्डोस्कोपिक माइट्रल व्हॉल्व रिप्लेसमेंट सर्जरी चा प्रगत प्राण वाचविणारा उपचार पर्याय दिला. छातीमध्ये कुठल्याही मोठ्या चिरा न मारता करण्यात येणाऱ्या या प्रक्रियेमुळे जखमा कमी होतात, रुग्ण लवकर रिकव्हर होतो रुग्नालयातील भरती राहण्याचा कालावधी देखील कमी होतो. तिच्या कुटुंबाच्या पाठिंब्याने तिचा धैर्यपूर्ण संमतीमुळे ही मिनिमलि इन्व्हिसिव्ह पण जीव वाचवणारी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे एक यशोगाथा बनली.असे डॉ. सिद्दिकी म्हणाल्या.
डॉ. सिद्दिकी यांनी सांगितले, या शस्त्रक्रियेचे नेतृत्व करण्याचे भाग्य मला मिळाले, परंतु एक उत्कृष्ट टीमने माझी साथ दिली ज्यात जनरल सर्जन डॉ. अजय हरदास डॉ. अविनाश रिणाईत, क्लिनिकल असिस्टंट डॉ. अवेस हसन, कार्डिएक अनेस्थेटिस्ट डॉ. प्रसाद पानबुडे नॉनइनव्हेसिव्ह कार्डिऑलॉजिस्ट डॉ. गौरव वाघळे यांचा समावेश होता. हे यश शस्त्रक्रिया कौशल्य, सहकार्य करुणेचे प्रतीक आहे. या सर्वांच्या तांत्रिक कौशल्यामुळे ही ऐतिहासिक शस्त्रक्रिया शक्य झाली
Previous Story Next Story