नागपूर -: झी5 ची अंधार माया ही पहिली मराठी हॉरर ओरिजनल सीरीज प्रेक्षकांना एका काळोख्या, गूढरम्य विश्वात घेऊन जाण्यासाठी सज्ज आहे. 30 मे 2025 रोजी प्रदर्शित होत असलेल्या या सीरीजचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते भिमराव मुडे यांनी केले असून एरिकॉन टेलिफिल्म्सअंतर्गत शर्मिष्ठा राऊत तेजस देसाई यांनी निर्मिती केली आहे. कथा व संवाद प्रल्हाद कुडतरकर यांचे असून स्क्रीनप्ले कपिल भोपटकर यांचे आहे. सीरीजमध्ये दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे अभिनेते किशोर कदम गूढ भूमिकेत दिसणार आहेत.
झी5 ने थरकाप उडवणाऱ्या हलत्या वाड्यासह महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर अशा शहरांत कॅम्पेनचे आयोजन करत अंधार माया या मराठी हॉरर ओरिजनल सीरीजचे लाँच केले. या सीरीजमधल्या जुन्या वाड्याच्या हुबेहूब प्रतिकृतीमुळे प्रेक्षकांना या सीरीजमधल्या अंगावर शहारा आणणाऱ्या जगाची झलक अनुभवता आली. वाडा नागपूर मध्ये वर्धा रोड, कर्वे नगर रोड, फेतरी, सोमलवाड़ा अशा वेगवेगळ्या ठिकाणी दिसला व प्रेक्षकांना या सीरीजमधल्या थरारक गोष्टीमध्ये गुंतून जाणं शक्य झालं. 30 मे रोजी फक्त झी5 वर या सीरीजचा एक्सक्लुसिव्ह प्रीमियर होत असून ही सीरीज मराठी व हिंदी प्रेक्षकांसाठी भावना व रहस्याने परिपूर्ण कथा सादर करेल.
झी 5 ची पहिली मराठी हारर सिरीज अंधार माया 30 मे ला प्रदर्शित
झी5 तर्फे थरारक कॅम्पेन लाँच त्यांची पहिली मराठी हॉरर सीरीज अंधार मायाच्या प्रमोशनसाठी हलताफिरता झपाटलेला वाडा
मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूरमध्ये दिसला वाडा
मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूरमध्ये दिसला वाडा