AROGYA

एसएमएचआरसीमध्ये इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी प्रक्रियेद्वारे रुग्णाला जीवनदान

Nagpur Media News 24 May, 2025
एसएमएचआरसीमध्ये इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी प्रक्रियेद्वारे रुग्णाला जीवनदान
नगपूरस्थित वानाडोंगरी येथील 1020 खाटांच्या शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ला
एसएमएचआरसीमध्ये इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी प्रक्रियेद्वारे रुग्णाला जीवनदान
नगपूर: वानाडोंगरी येथील 1020 खाटांच्या शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर सुपरस्पेशालिटी विंग असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुपरस्पेशालिटी इन्स्टिट्यूटच्या इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी विभागात प्राण वाचवणारी वैद्यकीय प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.53 वर्षीय महिला, ज्या काही दिवसांपूर्वी दुसऱ्या रुग्णालयात बकल म्यूकोसाच्या कॅन्सरसाठी शस्त्रक्रिया करून आल्या होत्या, त्यांना तात्काळ एसएमएचआरसीच्या 65 खाटांच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या तोंडातून अचानकपणे सुमारे 1 ते 1.5 लिटर रक्तस्राव झाला होता, ज्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली होती जीव धोक्यात आला होता.
रुग्णाची प्रकृती अधिक बिघडू नये म्हणून त्यांना तत्काळ कॅथलॅबमध्ये हलविण्यात आले. तेथे इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉ. निकुंज चौधरी यांनी त्वरित उपचार सुरू केले. ट्युमरला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी अडवण्यासाठी आपत्कालीन इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी प्रक्रियेची तयारी करण्यात आली.
डिजिटल सब्ट्रॅक्शन अँजिओग्राफी मध्ये एक्सटर्नल कॅरोटिड आर्टरी (फेशियल आर्टरी) मध्ये एक अन्युरिझम (फुगवटा)आढळून आला, ज्यामधून सक्रिय रक्तस्राव सुरू होता रुग्णाचा रक्तदाब कमी झाला होता. या स्थितीत उपचारात विलंब होऊ नये कारण मेटालिक कॉईल्स उपलब्ध व्हायला किमान 45 मिनिटे लागली असती म्हणून डॉ. चौधरी यांनी तातडीचा निर्णय घेतला एंडोक्रिल इंजेक्शनद्वारे अन्युरिझमच्या तोंड बंद केले, ज्यामुळे उपचार वेळेवर करता आले रुग्णाचा जीव वाचवता आला.
Previous Story Next Story