UDYOJAGTA

सॅमसंग ने सादर केली एआय वॉश आधारित बीस्पोक एआय टॉप लोड वॉशिंग मशीन

Nagpur Media News 24 May, 2025
सॅमसंग ने सादर केली एआय वॉश आधारित बीस्पोक एआय टॉप लोड वॉशिंग मशीन
सॅमसंग ने सादर केली एआय वॉश आधारित बीस्पोक एआय टॉप लोड वॉशिंग मशीन
भारतीयांना मिळणार स्मार्ट कार्यक्षवम वॉशिंगचा अनुभव
नवीन उत्पादने वेगवेगळ्या क्षमता पर्यायांसह उपलब्ध प्रत्येक घरातील वॉशिंगच्या गरजेनुसार, दर्जेदार वॉशिंग परिणामावर कोणताही तडजोड न करता एआय वॉश, एआय एनर्जी मोड आणि एआय व्हीआरटी यांसारखी वैशिष्ट्ये स्मार्ट, कार्यक्षम सायलेन्ट वॉशिंगचा अनुभव
गुरुग्राम:
भारतातील ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड सॅमसंगने बिस्पोक एआय फ्रंट लोड वॉशिंग मशीनना मिळालेल्या प्रतिसादानंतर बिस्पोक एआय श्रेणीमध्ये टॉप लोड वॉशिंग मशीन सादर केली आहे. ही नवी रेंज इंटिलिजंट कार्यक्षम तंत्रज्ञानासह कपड्यांची योग्य काळजी नव्याने परिभाषित करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. एआय वर आधारित आधुनिक फिचर्ससह ही रेंज ऊर्जेची बचत करते, कपड्यांची नीट काळजी घेते वापरण्यास सोपी आहे. या विस्तारामुळे सॅमसंगने इनोव्हेशनबाबतीत कटिबद्धतेला सिद्ध केले आहे वापरकर्त्यांना अधिक स्मार्ट व सहज सोप्या वॉशिंगचा अनुभव देण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
ही बिस्पोक एआय टॉप लोड वॉशिंग मशीन 8किलोग्रॅम, 10किलोग्रॅम, 12किलोग्रॅम 14किलोग्रॅम या क्षमतांमध्ये उपलब्ध आहे आधुनिक कार्यक्षम वॉशिंगचा अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. मशीन ब्लॅक कॅव्हियर, लव्हेंडर ग्रे नव्याने सादर केलेले डीप चारकोल ब्रशड नेव्ही या आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहेत, जे कोणत्याही आधुनिक घराच्या सजावटीशी सुसंगत आहेत.
एआय वॉश फीचर 3-स्टेप सेन्सिंगने सुसज्ज ही मशीन कपड्यांचा प्रकार वजन ओळखते त्यानुसार योग्य वॉशिंगची सेटिंग्स आपोआप सुचवते
Previous Story Next Story