AROGYA

वोक्हार्ट हॉस्पिटल्सतर्फे आंतरराष्ट्रीय नर्सेस डे निमित्त नर्सिंग हिरोंचा सन्मान

Nagpur Media News 16 May, 2025
वोक्हार्ट हॉस्पिटल्सतर्फे आंतरराष्ट्रीय नर्सेस डे निमित्त नर्सिंग हिरोंचा सन्मान
वोक्हार्ट हॉस्पिटल्सतर्फे आंतरराष्ट्रीय नर्सेस डे निमित्त नर्सिंग हिरोंचा सन्मान
वोक्हार्ट हॉस्पिटल्वसच्या विविध केंद्रांवर तब्बल 950 परिचारिका या कार्यक्रमाचा भाग बनल्या
नागपूर:
समर्पण, करुणा क्लिनिकल उत्कृष्टतेचा हृदयस्पर्शी उत्सव म्हणून, वोक्हार्ट हॉस्पिटल्सने मीरारोड, मुंबई सेंट्रल, राजकोट नागपूर येथील हॉस्पिटल्समध्ये आंतरराष्ट्रीय नर्सेस डे(परिचारिका दिन) साजरा केला. या उत्सवाचा एक भाग म्हणून, वोक्हार्ट हॉस्पिटल्स लिमिटेडने माय पेशंट, माय आयडियहा उपक्रम सुरू केला. हा पहिलाच अशा प्रकारचा उपक्रम आहे उद्देश परिचारिकांना नाविन्यपूर्ण विचार मांडण्यास सक्षम करणे आहे जेणेकरून रुग्णांची काळजी अनुभव सुधारण्यास आरोग्यसेवा खर्च कमी करण्यास मदत होईल. आरोग्य समस्या सोडविण्यात सर्वात आघाडीवर असणाऱ्या व्यक्ती म्ह्णून परिचारिकांना ओळखत, या उपक्रमाने 2025 च्या आंतरराष्ट्रीय नर्सेस डेची थीम केयरिंग फॉर नर्सेस, स्ट्रेंथनिंग इकॉनॉमिज ला हक्काचा आवाज मिळवून दिला. ही संकल्पना नर्सिंग व्यावसायिकांची सर्जनशीलता, अंतर्दृष्टी समर्पणाची जाणीव ठेवण्यासाठी पुरस्कृत करण्यासाठी एक व्यासपीठ मिळवून देत आरोग्य व्यवस्थांमध्ये महत्वपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी नर्सेसची महत्वाची भूमिका अधोरेखित करते.
संपूर्ण आठवडाभर चाललेल्या या उत्सवामध्ये 950 हून अधिक परिचारिकांनी सहभाग घेतला. या कालावधीत नर्सिंग समुदायाचा सन्मान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी विविध औदार्यपूर्ण समारंभ व उत्साही उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या उत्सवाची सुरूवात वोक्हार्ट अँथमच्या सामुदायिक गायनाने झाली. परिचारिकांनी नर्सिंगची शपथ घेत रुग्णसेवेच्या सामायिक उद्दिष्टाची पुनरावृत्ती केली. नर्सिंग विभागातील वरिष्ठ परिचारिकांना
अथक सेवेबद्दल नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत विशेष सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमांमध्ये पोस्टर ड्रॉइंग, गायन टॅलेंट शोकेस यांसारख्या सर्जनशील स्पर्धांचाही समावेश होता. यामुळे परिचारिकांना त्यांच्या व्यावसायिक भूमिकेपलीकडे स्वतःला व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ मिळाले. या सहभागात्मक सत्रांमुळे टीममधील एकात्मता, सर्जनशीलता आपुलकी वाढवण्यास मदत झाली. एक भावनिक उपक्रम म्हणून, ज्या परिचारिकांनी सेवा कालावधीत महत्त्वाचे टप्पे पार केले संबंधित हॉस्पिटलच्या प्रमुखांकडून सोन्याची नाणी देऊन गौरविण्यात आले. दीर्घकालीन योगदानाबद्दल आरोग्यसेवेवर पाडलेल्या प्रभावाबद्दल कार्यबद्दल करण्यात आलेला हा सत्कार वोक्हार्ट हॉस्पिटल्सची त्यांच्याप्रती असलेल्या कृतज्ञतेचे प्रतीक आहे.
वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या व्यवस्थापकीय संचालिका झहाबिया खोराकीवाला म्हणाल्या,
गुणवत्तापूर्ण रुग्णसेवा देण्यासाठी परिचारिकांच्या व्यावसायिक विकासात कल्याणामध्ये गुंतवणूक करणे अत्यावश्यक आहे. वोक्हार्टमध्ये, परिचारिकांना करिअरमध्ये सक्षम करण्यासाठी सतत प्रशिक्षण, मार्गदर्शन शैक्षणिक सहाय्य प्रदान करतो. त्याचप्रमाणे मेंटल हेल्थ सपोर्ट, वेलनेस डेज वर्क-लाईफ बॅलन्स प्रोग्रॅमसारख्या उपक्रमांद्वारे सर्वांगीण कल्याणास प्राधान्य देतो.
Previous Story Next Story