SMAMAJIK

पंडित रोणू मजुमदार यांना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री प्रदान

Nagpur Media News 30 Apr, 2025
पंडित रोणू मजुमदार यांना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री प्रदान
पंडित रोणू मजुमदार यांना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्रीव प्रदान मजुमदार यांनी हा पुरस्कार संपूर्ण भारताला, त्यांचे गुरु आई-वडिलांना केला समर्पित,या पुरस्काराने मला संगीत क्षेत्रात आणखी कठोर परिश्रम करण्याचे बळ - पंडित मजुमदार
नागपूर:
पंडित रोणू मजुमदार यांना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री प्रदान मजुमदार हा पुरस्कार भारताला, त्यांचे गुरु आई-वडिलांना केला समर्पित,पुरस्काराने संगीत क्षेत्रात आणखी कठोर परिश्रम करण्याचे बळ मिळाले आहे प्रख्यात बासरीवादक पंडित रोणू मजुमदार भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सोमवारी २८ एप्रिल २०२५ रोजी राष्ट्रपती भवन येथील एका भव्य समारंभात पद्मश्री पुरस्कार देवून गौरविण्यात आले. पंडित मजुमदार यांनी देशातील तिसऱ्या क्रमांकाचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार संपूर्ण देशाला, आई-वडील गुरूंना समर्पित केला.
पद्मश्री या सर्वोच्च मनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी आयुष्याच्या या वळणावर भावूक त्याचवेळी आनंदीही आहे. पुरस्कार देशाला, संगीताच्या या क्षेत्रात कारकीर्द घडवू पाहणाऱ्या प्रत्येकाला समर्पित करतो. हा पुरस्कार आईच्या पायावर समर्पित करायचा आहे. या पुरस्काराने तिच्या डोळ्यात आनंदाश्रु तराळले होते. हा पुरस्कार माझ्या गुरूंना म्हणजे भारतरत्न रवी शंकरजी, माझे गुरु पंडित विजय राघव राव माझे प्रथम गृरू व वडील भानू मजुमदारजी यांना समर्पित करतो,असे उद्गार पंडित मजुमदार यांनी पुरस्कार काढले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी,गृहमंत्री अमितभाई शाह यांचेही आभार मानतो. या क्षेत्रात गेली ५० वर्षे मी जे योगदान दिले त्याची दखल घेतली. आज पहलगाममध्ये घटना घडली आहे, पार्श्वभूमीवर आजचा हा क्षण काही मोठ्या प्रमाणावर साजरा करणार नाही. या घटनेने सर्वांना हादरवून टाकले आहे
Previous Story Next Story