नागपूर,:
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डी व श्री साईबाबा सेवा मंडळद्वारा संचालित श्री साई मंदिर, वर्धा रोड नागपूर यांच्या सहयोगाने श्री साईबाबांनी वापरलेल्या मूळ चर्म चरण पादुकां चा दर्शन सोहळा शनिवार 26 व रविवार 27 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. विदर्भाची प्रतिशिर्डी असलेल्या नागपूर येथील वर्धारोड स्थित साई मंदिरात 1976 साली मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यादरम्यान प्रथमच दुसऱ्यांदा 1979 साली श्रीदत्तजयंतीच्या पर्वावर या दिव्य चर्म चरण पादुकांचे आगमन झाले होते. तिसऱ्यांदा श्री साईबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त 2018 साली पादुकांचा दर्शन सोहळा पार पडला. चौथ्यांदा या दिव्य पादुकांचे आगमन साई मंदिर संस्थानात होणार आहे. 26 व 27 एप्रिल 2025 या दोन दिवशी या पादुकांचा भव्य दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 26 एप्रिल रोजी दुपारी 12 च्या आरतीनंतर ते रात्री मंदिर बंद होईपर्यंत या पादुका भक्तांच्या दर्शनास ठेवण्यात येतील तर, 27 एप्रिलला पहाटे 5.30 ते रात्री मंदिर बंद होईपर्यंत भक्तांना या पादुकांच्या दुर्लभ दर्शनाचा लाभ मिळणार आहे. 26 एप्रिल शनिवार रोजी सकाळी 9.30 वाजता साईबाबांच्या या दिव्य चर्म पादुकांचे नागपूर विमानतळावर आगमन होणार असून 10 वाजता सुरु होणाऱ्या भव्य पालखी मिरवणूकीच्या गाजावाजात पादुका साईमंदिरात आणण्यात येतील. पादुकांचे पाद्यपूजन व 12 वाजताची आरती झाल्यानंतर पादुका दर्शनास ठेवण्यात येतील. पादुकांच्या आगमनाची मुहूर्तवेढ श्री साई मंदिर धंतोली व श्री साईबाबा सेवा मंडळाचे (वर्धा रोड) संस्थापक अध्यक्ष प.पू. श्री विजयबाबा कोन्ड्रा यांच्या हस्ते सकाळी 8 वाजता आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाने रोवण्यात येईल.
श्री साई मंदिर नागपूर येथे श्री साई बाबांच्या मूळ चर्म चरण पादुकांचा दर्शन सोहळा
श्री साई मंदिर नागपूर येथे श्री साई बाबांच्या मूळ चर्म चरण पादुकांचा दर्शन सोहळा 26-2 टीव्ही7 एप्रिल रोजी आयोजित
श्री साई बाबा सेवा मंडळ व श्री साई बाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सोहळ्याचे आयोजन
सांस्कृतिक व संगीतमय कार्यक्रमांची रेलचेल
श्री साई बाबा सेवा मंडळ व श्री साई बाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सोहळ्याचे आयोजन
सांस्कृतिक व संगीतमय कार्यक्रमांची रेलचेल