नागपूर: प्रवर्तक पाऊल टाकून एअरटेलने ब्लिंकिट या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म सोबत भागीदारीची घोषणा केली आहे दहा मिनिटांत सिमकार्ड पोहोचविता येणार आहे. टेलिकॉम कंपनी कडून ही पहिलीच सेवा आहे . देशातील 16 शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे कालांतराने शहरांना गावांना जोडण्याची योजना आखली गेली आहे.हे सहकार्य महत्त्वपूर्ण टप्पा दर्शवित आहे ग्राहकांना ₹49 एवढ्या नाममात्र सुविधा शुल्कात किमान 10 मिनिटांत घरपोच सिमकार्ड प्राप्त करता येईल. सिमकार्ड मिळाल्यावर ग्राहकाला आधारवर आधारित के.वाय.सी प्रमाणीकरण करून सोप्या करण्याच्या प्रक्रियेतून नंबर सक्रिय करता येईल. पोस्टपेड प्रीपेड दोन्ही प्लॅन्स मधून निवड करण्याचा एअरटेल नेटवर्कमध्ये पोर्टिंगसाठी एम.एन.पी सुरू करण्याचा पर्याय उपलब्ध केला जाईल. ग्राहकांना प्रक्रिया सुलभ सक्रिय करण्याचा लाभ म्हणून ऑनलाइन लिंकवर जाऊन व्हिडिओ पाहता येईल.पद्धतीने सक्रिय केलेल्या एअरटेल ग्राहकांना कोणतीही मदत हवी असल्यास, एअरटेल थँक्स अॅिप द्वारे मदत केंद्रात जाण्याचा पर्याय उपलब्ध असेल. ग्राहकांना 9810012345 वर कॉल करून सपोर्टशी संपर्क करून मदत मिळविता येईल. सिमकार्ड मिळाल्यावर ग्राहकांना 15 दिवसांच्या आत सिम सक्रिय करणे बंधनकारक आहे जेणेकरून सुरळीत त्रास न होता स्थित्यंतर करता येईल.
भाष्य करताना, सिद्धार्थ शर्मा, सी.ई.ओ. कनेक्टेड होम्स विपणन संचालक, भारती एअरटेल म्हणाले की: एअरटेलमध्ये काही करत आहोत ग्राहकांचे जीवन सोपे करणे केंद्रस्थानी ठेवलेले असते. खूप आनंदी आहोत कारण 16 शहरांमधील ग्राहकांच्या घरी 10 मिनिटांमध्ये सिमकार्ड पोहोचविण्यासाठी ब्लिंकिटसोबत भागीदारी केलेली आहे कालांतराने अतिरिक्त शहरांमध्ये या भागीदारीचा विस्तार करण्याची योजना आखलेली आहे.
एअरटेल ब्लिंकिट सोबत भागीदारी अवघ्या 10 मिनिटांत सिमकार्ड
एअरटेल ब्लिंकिट सोबत भागीदारी अवघ्या 10 मिनिटांत सिमकार्ड घरबसल्या स्वयं-केवायसी प्रक्रिया करून जलद व सुरक्षित पद्धतीने ते सक्रिय करता येणार