नागपूर: 1020 खाटांची क्षमता असलेल्या नागपूर शालिनीताई मेघे हॉस्पिटल अण्ड रिसर्च सेंटर एसएमएचआरसी आयोजित मोफत मेगा एचपीव्ही लसीकरण शिबिराचा २९२ युवतींनी उत्स्फूर्तपणे लाभ घेतला. यावेळी १८ ते २१ वर्षे वयोगटातील युवतींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून बचाव करणारी लस मोफत देण्यात आली.
दत्ता मेघे मेडिकल कॉलेज (डीएमएमसी), स्वास्थ्य वृक्षा फाउंडेशन(एसव्हीएफ) एनएसआयसी यांच्या सहकार्याने शालिनीताई मेघे मदर चाईल्ड केयर हॉस्पिटल य
या शिबिराचे यशस्वीपणे आयोजित केले.
शिबिराचे उद्घाटन एसएमएचआरसी चे उपसंचालक (कम्युनिटी सर्व्हिसेस) डॉ. नरेश गिल यांनी केले. जीर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध लढा देण्यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचे महत्त्व अधोरेखित केले आणि या उपक्रमामागील एकत्रित प्रयत्नांचे कौतुक करत, जनआरोग्य उपक्रमांना सतत गती देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र विभागाच्या प्राध्यापकांनी प्रभावी जनजागृती सत्रे घेतली. यात एचपीव्ही लसीचे महत्त्व, तिचा गर्भाशय मुखाचा कर्करोग, जननेंद्रियांवरील गाठी एचपीव्ही संदर्भातील इतर आजारांपासून संरक्षण करणारा प्रभाव स्पष्ट करण्यात आला. लसीकरणाचे सर्वोच्च फायदे लैंगिक संपर्काच्या आधीच मिळतात, म्हणूनच ही लस किशोरवयीन आणि तरुणांसाठी शिफारसीय आहे.
दत्ता मेघे मेडिकल कॉलेज, कॉलेज ऑफ अलायड हेल्थ सायन्सेस आणि नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला, ज्यातून युवांमध्ये वाढती जागरूकता सकारात्मक सहभाग दिसून आला.
स्वास्थ्य वृक्षा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. दीपिका चंधोक यांनी सांगितले की, ही लस म्हणजे आयुष्यभर टिकणारी सुरक्षा असून प्रिय व्यक्तींना दिलेली सर्वात चांगली भेट आहे.
एनएसआयसी एमजीआय यांच्या या उपक्रमाचे डॉ. नरेश गिल यांनी विशेष कौतुक केले
शालिनीताई मेघे हॉस्पिटल रिसर्च सेंटरमध्ये लसीकरण शिबिर
शालिनीताई मेघे हॉस्पिटल अॅाण्ड रिसर्च सेंटरमध्ये आयोजित मोफत मेगा एचपीव्ही लसीकरण शिबिराचा २९२ युवतींनी घेतला लाभ
एसव्हीएफ आणि एनएसआयसी यांच्यातर्फे लसीकरण शिबिराचे आयोजन
एसव्हीएफ आणि एनएसआयसी यांच्यातर्फे लसीकरण शिबिराचे आयोजन