नागपूर,: पार्किन्सन हा मेंदूचा हळूहळू वाढणारा न्यूरोडिजेनेरेटिव्ह विकार आहे. मुख्यत्वे शारीरिक हालचालींवर परिणाम करतो. पार्किन्सनचे त्वरित निदान योग्य उपचार केल्यास रुग्ण दीर्घकाळ स्वावलंबी राहू शकतो, असे प्रतिपादन वोक्हार्ट हॉस्पिटल नागपूरचे विख्यात न्यूरॉलॉजिस्ट डॉ. अंकुर जैन(एमडी डीएनबी डीएम न्यूरोलॉजी) यांनी केले.
सामान्यत पार्किन्सनची परिस्थिती वयाच्या 60 वर्षांनंतर आढळून येते. काही रुग्णांमध्ये वयाच्या चाळीशीच्या आसपासच लक्षणे दिसू लागली आहेत. या रोगात मेंदूतील सबस्टँशियानिग्रा नावाच्या भागातील डोपामिन तयार करणाऱ्या पेशी हळूहळू नष्ट होतात. डोपामिन हे महत्त्वाचं न्यूरोट्रान्समीटर असून शरीराच्या मांसपेशींच्या समतोल सुरळीत शारीरिक हालचालींसाठी आवश्यक असतं.अशी माहिती डॉ. अंकुर जैन यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, पार्किन्सन रोगाची चार प्रमुख लक्षणे आहेत असून, विश्रांतीच्या वेळी अधिक जाणवणारी थरथर(ट्रेमर्स), हालचाली मंदावणे (ब्रेडीकाइनेशिया), स्नायूंची ताठरता चालण्यात व समतोल राखण्यात अडचण यांचा यात मुख्य समावेश आहे. यासोबतच झोपेचा त्रास, कॉन्स्टिपेशन, नैराश्य स्मरणशक्ती कमी होणे लक्षणे देखील दिसू शकतात. रुग्णांमध्ये आढळून येणारी लक्षणे न्यूरॉलॉजिकल टेस्ट्सद्वारे डॉक्टर याचे निदान करतात. रक्त चाचण्या, सीटी स्कॅन किंवा एमआरआय यासाठी आवश्यक नसतात. सामान्य चाचण्यांद्वारेच ही तपासणी होते. वेळा डोपामिन ट्रान्सपोर्टर स्कॅन (डीएटी स्कॅन) उपयुक्त ठरतो. तो महाग असून सर्वत्र उपलब्ध नाही.
उपचारासंबंधी बोलतात डॉ. अंकुर जैन यांनी स्पष्ट केले कि पार्किन्सनचा सध्या कोणताही कायमस्वरूपी इलाज नाही. हळूहळू वाढणारा विकार असल्यामुळे योग्य औषधोपचारांमुळे रुग्ण स्वावलंबी राहू शकतो. उपचारांमध्ये लेव्होडोपा-कार्बिडोपा हे औषध सर्वाधिक प्रभावी मानले जाते.
पार्किन्सनचे त्वरित निदान उपचाराने रुग्ण स्वावलंबी
पार्किन्सनचे त्वरित निदान उपचाराने रुग्ण स्वावलंबी
वोक्हार्ट हॉस्पिटलचे डॉ. अंकुर जैन यांचे प्रतिपादन
वोक्हार्ट हॉस्पिटलचे डॉ. अंकुर जैन यांचे प्रतिपादन