AROGYA

वोक्हार्ट हॉस्पिटल्स, इंटर्नल मेडिसिन क्रिटिकल केअरमध्ये वेळेवर उपचारास महत्त्व

Nagpur Media News 07 Apr, 2025
वोक्हार्ट हॉस्पिटल्स,  इंटर्नल मेडिसिन  क्रिटिकल केअरमध्ये वेळेवर उपचारास  महत्त्व
वोक्हार्ट हॉस्पिटल्स, इंटर्नल मेडिसिन क्रिटिकल केअरमध्ये वेळेवर उपचारास महत्त्व इंटर्नल मेडिसिन व क्रिटिकल केअर विभागाचे तज्ञ सल्लागार डॉ. जयेश तिमाने यांचे प्रतिपादन जागतिक आरोग्य दिनानिमित्त विशेष पुढाकार
नागपूर,:
दरवर्षी ७ एप्रिल रोजी जग जागतिक आरोग्य दिन साजरा करतं. हा दिवस म्हणजे समाजाला भेडसावणाऱ्या महत्त्वाच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत जनजागृती करण्यासाठी असतो. यावर्षी आरोग्य चांगल्या जीवनशैलीबद्दल विचार करत असताना वोक्हार्ट हॉस्पिटल्स येथील इंटर्नल मेडिसिन व क्रिटिकल केअर विभागाचे तज्ञ सल्लागार डॉ. जयेश तिमाने(डीएनबी-इंटर्नल मेडिसिन, ईडीआयसी-ब्रुसेल्स) यांनी आधुनिक औषधींबाबतच्या गंभीर पैलूवर भर दिला आहे इंटर्नल मेडिसिन क्रिटिकल केअरमध्ये तीव्र आजारांची वेळेवर ओळख उपचार व्यवस्थापन हा महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे जो बऱ्याचदा जीवन मृत्यूमधील फरक स्पष्ट करतो.
क्रिटिकल केअरमध्ये अनेक पातळीवर न दिसणारी लढाई सुरु असते. वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर येथील आयसीयूमध्ये प्रत्येक सेकंद मोलाचा असतो. येथे गंभीर स्थितीतले रुग्ण भरती होतात. तीव्र संसर्ग (सेप्सिस), हृदयविकाराचे झटके, श्वसनविकार गुंतागुंतीच्या चयापचयासंबंधी अडचणी यांसारख्या जीवघेण्या परिस्थितीसह रुग्ण रोज रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतात. क्रिटिकल केअर यासाठीच आव्हानात्मक विभाग आहे कारण येथे आजार वेगाने फोफावू शकतो गुंतागुंत असते. लवकर निदान, तत्काळ उपचार प्रगत देखभाल प्रणाली या गोष्टी रुग्णाच्या जगण्याच्या शक्यता वाढवतात, असे डॉ. जयेश तिमाने म्हणाले.
ही लढाई फक्त आयसीयू मध्येच सुरू होत नाही तर, ती बऱ्याचदा रुग्णाकडून दुर्लक्षित झालेल्या किरकोळ लक्षणांपासून सुरू होते. इंटर्नल मेडिसिनमध्ये लक्षणं लवकर ओळखणं, जुनाट आजारांचं प्रभावी व्यवस्थापन करणं गंभीर किंवा मेंदूसंबंधी आणीबाणीपर परिस्थितीत जाण्यापासून रोखणं हेच उद्दिष्ट असल्याचे डॉ. तिमाने म्हणाले.
Previous Story Next Story