AROGYA

एमओ|सी कॅन्सर केअर नागपूर ची विशेष स्तन कॅन्सर निदान मोहीम

Nagpur Media News 31 Mar, 2025
एमओ|सी कॅन्सर केअर नागपूर ची विशेष स्तन कॅन्सर  निदान मोहीम
मार्च महिन्यातील जागतिक महिवला दिनाचे औचित्य साधून एम|ओ|सी- नागपूर ने जिल्यात २३ ते २७ मार्च 2025 दरम्यान विविध ठिकाणी स्तनांच्या कर्करोग तपासणी टप्प्यात निदान हेतु मॅमोग्राफी शिबिराचे आयोजन केले होते.
नागपुर: मार्च महिन्यातील जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एम|ओ|सी- नागपूर ने जिल्यात २३ ते २७ मार्च 2025 दरम्यान विविध ठिकाणी स्तनांच्या कर्करोग तपासणी टप्प्यात निदान हेतु मॅमोग्राफी शिबिराचे आयोजन केले होते.
एम|ओ|सी नागपूर चे प्रसिद्ध कर्करोगतज्ञ डॉ. मकरंद रणदिवे यांच्या पुढाकाराने मार्गदर्शनाखाली सावनेर, मानेवाडा, मिलिट्री हॉस्पिटल कामठी, जरीपटका व मेघरे हॉस्पिटल भंडारा येथे मॅमोग्राफी शिबीर यशस्वीरित्या पार पडले.
डॉ. मकरंद रणदिवे उपस्थित महिलांना स्तनांच्या व इतर कर्करोगाबद्दल विस्तृत माहिती दिली. उपस्थित सर्व महिलांना स्तनांचा, गर्भाशयाचा व गर्भाशयमुखाच्या कर्करोगाची लक्षणे कशी ओळखावी याबद्दल माहिती दिली व त्यांचे शंकानिरासनही केले.
Previous Story Next Story