SMAMAJIK

गुढीपाडवा मेळाव्या संदर्भात नागपुरात मनसेची विशेष बैठक ! तुषार गिऱ्हे

Nagpur Media News 30 Mar, 2025
गुढीपाडवा मेळाव्या संदर्भात नागपुरात मनसेची विशेष बैठक ! तुषार गिऱ्हे
गुढी पाडवा निमित्य मनसे चे नेते तुषार गिरे यांनी नागपूर शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांना आवाहन केलं की शाखा निहाय विविध कार्यक्रम राबविणे व मराठी हिंदू नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करावे
नागपूर; दक्षिण -पश्चिम विभागातर्फे उपशहर अध्यक्ष तुषार गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात व विभाग अध्यक्ष हर्षद दसरे यांच्या नेतृत्वात दक्षिण - पश्चिम नागपूर विभागातील सर्व अंगीकृत विभागाच्या /सेल च्या महिला व पुरुष पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक तुषार गिऱ्हे यांच्या कार्यालयात नुकतीच संपन्न झाली. बैठकीमध्ये येत्या 30 तारखेला शिवाजी पार्क येथे होणाऱ्या मुंबईच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या कार्यक्रमा विषयी तुषार गिऱ्हे यांनी माहिती दिली व जास्तीत जास्त मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले
Previous Story Next Story