AROGYA

डिहायड्रेशनमुळे मेंदूत जीवघेणी रक्ताची गाठ

Nagpur Media News 25 Mar, 2025
डिहायड्रेशनमुळे मेंदूत जीवघेणी रक्ताची गाठ
डिहायड्रेशनमुळे मेंदूत जीवघेणी रक्ताची येणाऱ्या गाठी साठी वेळीच उपचार करणे गरजेचे आहे सत्ता प्रवासाने व पाण्याच्या कमी प्रमाणामुळे हा दुर्मिळ आजार होऊ शकतो डॉ अमित भट्टी यांनी अत्याधुनिक तंत्राचा अवलंब करून कित्येक रुग्णांवर उपचार करून प्राण वाचविले प्रवासात पाणी भरपूर प्रमाणात सेवन करावे असा संदेश पत्रकार परिषेद च्या माध्यमातून दिला
नागपूर: डिहायड्रेशनमुळे मेंदूत जीवघेणी रक्ताची गाठ
वेळीच प्रभावी उपचार करत डॉ. अमित भट्टी यांनी वाचवले प्राण! एम. यांचा होळीचा सण रंगांनी आनंदाने भरलेला होता. पण त्यांच्या पतींसाठी हा सण मोठे संकट घेऊन आला.
सुरुवातीला हलकीशी डोकेदुखी जाणवली होती, जी मायग्रेन असेल असे दोघांना वाटले. काही दिवसांनी अचानक फिट येऊन ते कोसळले परिस्थिती गंभीर झाली, शरीराचा पूर्ण उजवा भाग कमजोर झाला बोलूही शकत नव्हते.
तातडीने रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांच्या लक्षात आले की ते खूप डिहायड्रेटेड (शरीरात पाण्याची कमतरता) झाले आहेत., एमआरआय पुढील चाचण्यांमध्ये हे स्पष्ट झाले की मेंदूमध्ये सेरेब्रल व्हेनस सायनस थ्रॉम्बोसिस (सीव्हीएसटी) नावाची एक दुर्मिळ पण गंभीर समस्या निर्माण झाली आहे. समस्या मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये गाठ तयार झाल्यामुळे होते यातून मेंदूमध्ये रक्तस्राव (ब्रेन हॅमरेज) देखील होऊ शकतो.
डॉक्टरांनी त्वरित रक्त पातळ करणारी औषधे सुरू केली प्रकृती अजूनच बिघडत गेली. सतत फिट्स येऊ लागल्या स्टेटस एपिलेप्टिकस नावाची जीवघेणी स्थिती निर्माण झाली. रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे दिसून आल्यावर नागपूरचे सुप्रसिद्ध न्युरोलॉजिस्ट स्ट्रोक तज्ज्ञ डॉ. अमित भट्टी यांना बोलावण्यात आले.
नेहमीप्रमाणे औषधांनी रक्ताची गाठ पातळ होण्यावर अवलंबून न राहता, डॉ. भट्टी यांनी मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टॉमी नावाची अत्याधुनिक कमी शस्त्रक्रियेची उपचारपद्धती प्रभावीपणे पार पाडली. या प्रक्रियेदरम्यान पायाच्या शिरेमध्ये केवळ ३ मिमीचे छोटे छिद्र करण्यात आले ट्यूब मेंदूपर्यंत पोहोचवण्यात आली. या ट्यूबच्या मदतीने मेंदूतून रक्ताची गाठ थेट काढून टाकण्यात आली. उपचारानंतर केवळ काही तासांतच रुग्णाला फिट येणे बंद झाले केवळ २४ तासांत त्यांचा उजवा भागही पूर्ववत काम करू लागला. कोणतीही मोठी शस्त्रक्रिया किंवा टाके न लावता डॉ. अमित भट्टी यांनी रुग्णाला जीवनदान दिले.
तपासणीत असे आढळून आले की रुग्णाला कामाच्या व्यापामुळे सततच्या प्रवासामुळे शरीरात पाण्याची कमतरता झाली होती. त्यातच उन्हाळ्याला असल्याने तापमान वाढीमुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली. यामुळे रक्त घट्ट झाले मेंदूत गाठ निर्माण झाली.
ही सर्वांसाठीच धोक्याची सूचना असून डिहायड्रेशनचा सामना करण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे.
Previous Story Next Story