१९ मार्च, हरिद्वार : इंडियनऑईलचे अध्यक्ष ए. एस. साहनी यांनी आज देशभरातील विविध ठिकाणी इंडियनऑईलच्या परिवर्तन - प्रिझन टू प्राईड या उपक्रमाच्या दहाव्या नयी दिशा - रिडिफायनिंग द फ्युचर या उपक्रमाच्या सातव्या टप्प्याचा शुभारंभ केला. राज्य सरकार तुरुंग प्रशासन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ करण्यात आला.
१५ ऑगस्ट २०२१ रोजी परिवर्तन - प्रिझन टू प्राईड २६ जानेवारी २०२३ रोजी नयी दिशा रिडिफायनिंग द फ्युचर हे उपक्रम इंडियनऑईलने सुरू केले. तुरुंगातील कैदी आणि सुधारगृहातील मुलांच्या जीवनात खेळांच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडवून आणणे हा या दोन्ही उपक्रमांचा उद्देश आहे. या नव्या उपक्रमाच्या माध्यमातून इंडियनऑईल २२ तुरुंग ५ बालसुधारगृहांमधील १००० हून अधिक व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणार आहे.कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी इंडियनऑईलचे अध्यक्ष ए. एस. साहनी म्हणाले, या उपक्रमाचा सर्वात मोठा यशस्वी परिणाम म्हणजे आयुष्यात नेहमी दुसरी संधी मिळू शकते हा विश्वास लोकांमध्ये निर्माण करणे आहे. विविध खेळांमध्ये प्रशिक्षण मिळवल्या नंतर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी कैद्यांना व बालसुधारगृहातील मुलांना मिळते. त्यामुळे ऊर्जा योग्य दिशेने वळवली जाते. या छोट्याशा प्रयत्नातून कैद्यांच्या जीवनात शिस्त, उद्देश नवी आशा निर्माण करू इच्छितो, जेणेकरून ते सन्मानाने समाजात आपले स्थान पुन्हा मिळवू शकतील.
इंडियनऑईल तर्फे तुरुंगातील कैदी आणि सुधारगृहांसाठी परिवर्तनशील उपक्रमांचा विस्तार
१५ ऑगस्ट २०२१ रोजी परिवर्तन - प्रिझन टू प्राईड २६ जानेवारी २०२३ रोजी नयी दिशा रिडिफायनिंग द फ्युचर हे उपक्रम इंडियनऑईलने सुरू केले. तुरुंगातील कैदी सुधारगृहातील मुलांच्या जीवनात खेळांच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडवून आणणे हा या दोन्ही उपक्रमांचा उद्देश आहे.