नागपूर,: वोक्हार्ट हॉस्पिटलचे रोबोटिक सांधे प्रत्यारोपण व आर्थ्रोस्कोपी शल्यचिकित्सक डॉ. मुकुंद अग्रवाल यांनी ऑर्थोपेडिक्स क्षेत्रात आठ वर्षांहून अधिक काळ रुग्णांची सेवा केली , मिनिमली इन्व्हेसिव्ह तंत्रज्ञानाद्वारे जॉईंट हिप रिप्लेसमेंट, वयस्कर रुग्णांमध्ये जॉईंट रिकन्सस्ट्रक्शन , आर्थ्रोस्कोपी, गुंतागुंतीच्या फ्रॅक्चरचे व्यवस्थापन, ऑर्थोबायोलॉजिक्स रीजनरेटिव्ह मेडिसिन यामध्ये कौशल्य मिळवले आहे. कस्तुरबा मेडिकल कॉलेज, मणिपाल एनएचएस हॉस्पिटल (इंग्लंड) मेडस्टार वॉशिंग्टन हॉस्पिटल (अमेरिका) येथे उच्च प्रशिक्षण घेतले आहे.
मिनिमली इन्व्हेसिव्ह (सब-व्हॅस्टस) तंत्रज्ञानाद्वारे गुडघ्याची शस्त्रक्रिया हिप रिप्लेसमेंटसाठी डायरेक्ट अँटेरियर अप्रोच (डीएए) विशेष तंत्रज्ञानामुळे रुग्णांमध्ये आढळून येणाऱ्या शारीरिक आव्हानांना तोंड देता येते. या तंत्रांमुळे स्नायूंवर कमी ताण येतो, रक्तस्त्राव कमी होतो, वेदना कमी होतात रुग्ण कमी वेळात पूर्वीप्रमाणे बरा होतो.
भारतीय ऑर्थोपेडिक क्षेत्रात प्रगती होऊन आजही अनेक भारतीय लोक नकळतपणे सांधेविकारांच्या प्राथमिक लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. गुडघ्यात सतत जडपणा जाणवणे, जिने चढताना त्रास होणे, सांधे सूजणे किंवा दैनंदिन कामकाज करताना सांध्यांना वेदना होणे लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने नंतर गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया कराव्या लागू शकतात. योग्य वेळी निदान व उपचार घेतल्यास या समस्या टाळता येऊ शकते
सांधेविकार उपचारात क्रांती : भारतातील ऑर्थोपेडिक उपचारांचा उत्कृष्टतेकडे प्रवास
सांधेविकार उपचारात क्रांती : भारतातील ऑर्थोपेडिक उपचारांचा उत्कृष्टतेकडे प्रवास ऑर्थोपेडिक्स अर्थात अस्थिरोग उपचारांच्या क्षेत्रात सांध्यांची काळजी घेणे विशेषतः नागरिकांसाठी काळाची गरज बनली आहे. भारतात सांध्यांचे आजार झपाट्याने वाढत आहेत. सुमारे १५ टक्के भारतीय नागरिक ऑस्टिओआर्थरायटिसने (सांधेधुखीचा विकार ज्यात हळूहळू सांध्यांचा त्रास होतो)त्रस्त आहे