AROGYA

वोक्हार्ट हॉस्पिटल्सची किडनी संवर्धनासाठी तत्परता

Nagpur Media News 11 Mar, 2025
वोक्हार्ट हॉस्पिटल्सची किडनी संवर्धनासाठी तत्परता
वोक्हार्ट हॉस्पिटल्सची किडनी संवर्धनासाठी तत्परता वाढत्या किडनी समस्यांचा धोका जागतिक किडनी दिनानिमित्त कृतीतून दर्शविली वचनबद्धता भारतामध्ये किडनीशी संबंधित आजार वेगाने वाढत आहेत. क्रॉनिक किडनी आजार किडनी स्टोन्स किडनी इंज्युरीसारख्या समस्या आढळत आहे. जागतिक किडनी दिन २०२५ हा किडन्या ठीक आहेत का? लवकर ओळखा किडनीचे आरोग्य जपा जनजागृती घडविणाऱ्या संकल्पनेवर साजरा होत आहे.
नागपूर,;
भारतामध्ये किडनीशी संबंधित आजार वेगाने वाढत आहेत. क्रॉनिक किडनी आजार किडनी स्टोन्स किडनी इंज्युरीसारख्या समस्या आढळत आहेत. जागतिक किडनी दिन २०२५ हा किडन्या ठीक आहेत का? लवकर ओळखा किडनीचे आरोग्य जपा या जनजागृती घडविणाऱ्या संकल्पनेवर साजरा होत आहे.
वाढत्या किडनी समस्यांचा धोका ओळखत नागपूर येथील वोक्हार्ट हॉस्पिटल किडनी आरोग्य संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवत तत्परता स्पष्ट करत आहे. जागतिक किडनी दिनाच्या निमित्ताने वोक्हार्ट हॉस्पिटल्सतर्फे किडनी विकारग्रस्त रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी अंगदान करीत अमूल्य योगदान देणाऱ्या निःस्वार्थ व्यक्ती व कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ व नेफ्रोलॉजिस्ट डॉ. सुर्याश्री पांडे अंगदानासंदर्भात सखोल मार्गदर्शन केले. जिवंत किंवा मृत्यू पश्चात किडनी प्रत्यारोपण करून एखाद्या रुग्णाचे जीवन वाचवले आहे व्यक्तींच्या प्रेरणादायी कथा सर्वांसोबत सामायिक करण्यात आल्या. उपस्थितांसाठी अंत्यंत प्रेरणादायी ठरले. जिवंत व मृत्यू पश्चात अंगदानातील फरक डॉ. पांडे यांनी स्पष्ट केला उपस्थितांना किडनी प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णांकरिता उपलब्ध पर्यायांची माहिती मिळाली अवयवदानामुळे रुग्ण, कुटुंब समाजावर कसा सकारात्मक परिणाम होतो जाणीव झाली. अंगदान केवळ रुग्णालाच नव्हे, तर त कुटुंबियांना संपूर्ण समाजाला मदत करू शकते हे स्पष्ट झाले. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांसाठी विशेष किडनी केअर पॅकेज कुपन्स उपलब्ध करून देण्यात आले किडनी आरोग्यासाठी आवश्यक तपासण्या उपचार समाविष्ट आहेत.
अलीकडील आकडेवारीनुसार, भारतातील प्रत्येक सात प्रौढ व्यक्ती पैकी एक व्यक्ती किडनी विकाराने ग्रस्त आहे. मधुमेह उच्च रक्तदाब हे यामागील प्रमुख कारणे आहेत. अनियमित आहार, स्थूलता, गतिहीन जीवनशैली वाढलेला ताण हे देखील किडनीच्या समस्यांमध्ये भर घालणारे घटक आहेत, अशी माहिती तज्ञांनी यावेळी दिली.
Previous Story Next Story