AROGYA

वोक्हार्ट हॉस्पिटल्समध्ये महिला दिनानिमित्त आय एम फिअरलेस मोहिमेचे आयोजन

Nagpur Media News 08 Mar, 2025
वोक्हार्ट हॉस्पिटल्समध्ये महिला दिनानिमित्त आय एम फिअरलेस मोहिमेचे आयोजन
वोक्हार्ट हॉस्पिटल्समध्ये महिला दिनानिमित्त आय एम फिअरलेस मोहिमेचे आयो जन अडथळ्यांवर मात करत आरोग्याचा उत्सव साजर आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भारतभरातील १८०० महिलांचा कर्मचाऱ्यांचा सहभाग
नागपूर:
वोक्हार्ट हॉस्पिटल्सने या वर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत आय एम फिअरलेस मोहिमेचे आयोजन केले. मुंबई सेंट्रल मीरा रोड राजकोट नागपूर येथील विविध शाखांमधील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. रहिवासी डॉक्टर डॉक्टर परिचारिका प्रशासकीय कर्मचारी सफाई कर्मचारी इतर विभागांचे सहकारी मिळून तब्बल १८०० महिला कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. महिलांच्या आरोग्यासंदर्भात जागरूकता वाढवणे प्रतिभेला वाव देणे संस्थेमध्ये एकजूट व सहकार्याची भावना निर्माण करणे हा या मोहिमेमागील उद्देश होता.
कार्यक्रमात नामवंत वैद्यकीय तज्ञ स्त्रीरोग व प्रसूती तज्ञांनी महिलांच्या आरोग्यावर मार्गदर्शन केले. महिलांच्या पुनरुत्पादनक्षम आरोग्याविषयी सामान्य समस्या दैनंदिन स्व:आरोग्य मूल्यांकनाचे महत्त्व, लवकर निदानाद्वारे गंभीर आजार टाळण्याचे फायदे यावर त्यांनी मार्गदर्शन केले. व्याख्यानांनंतर डॉक्टरांसोबत संवाद व प्रश्नोत्तर सत्र आयोजित करण्यात आले ज्यामुळे सहभागींसाठी हा अनुभव अधिक माहितीपूर्ण उपयुक्त ठरला.
महिला दिनाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी केक कटिंग, मनोरंजक खेळ एकत्रीकरणाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला.
महिला आरोग्यासाठी प्रतिबद्धतेचा भाग वोक्हार्ट हॉस्पिटल्सने ८ मार्च ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत पॅप स्मीयर टेस्ट मॅमोग्राफी डॉक्टर कन्सल्टेशनवर २५% सूट दिली.वोक्हार्ट हॉस्पिटल्स ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालिका जहाबिया खोऱाकीवाला यांनी या प्रसंगी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या माध्यमातून महिलांना निर्भयपणे जगण्यासाठी सक्षम करण्यावर विश्वास ठेवतो
Previous Story Next Story