नागपूर,: -भारतातील कृषी क्षेत्रात जैव तंत्रज्ञानाच्या वापराबाबत चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील प्रगतशील शेतकऱ्यांनी विज्ञानाधारित धोरणांची मागणी केली असून प्रगत कृषी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा हक्क अधोरेखित केला आहे. नॅशनल फार्मर्स एम्पॉवरमेंट इनिशिएटिव्ह अर्थात एनएफईआयच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत शाश्वत उत्पादनक्षम शेतीसाठी जैव तंत्रज्ञानाच्या महत्त्वावर भर दिला.
विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी जैव तंत्रज्ञानासह अनुवांशिकरित्या सुधारित (जीएम) वाणांची पिके उपलब्ध करून देण्याची मागणी केली.इतर क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग होत असेल तर शेती सुद्धा मागे राहता काम नये असे म्हणणे आहे. जीएम पिकांमुळे कीटकनाशक रासायनिक खतांचा अधिक वापर होत असल्याचा समज चुकीचा असून, जगभरात या पिकांच्या लागवडीमुळे प्रत्यक्षात रासायनिक वापर कमी झाला आहे, असे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. अमेरिका, ब्राझील अर्जेंटिना यांसारख्या देशांतील शेतकरी अनेक वर्षांपासून या तंत्रज्ञानाचा लाभ घेत आहेत, भारतीय शेतकरी अद्याप त्यापासून वंचित आहेत, असे सांगितले.
वांगे, मोहरी, कलिंगड सोयाबीन यांसारख्या पिकांसाठी जैवतंत्रज्ञानाची मागणी होत असतानाच, शेतकऱ्यांनी कापसाचे महत्त्व अधोरेखित केले नवीन बीटी वाण आणण्याची गरज असल्याचे सांगितले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशन अर्थात एमटीटीएम स्थापन करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे कौतुक केले. या योजनेत कापूस हा मुख्य कच्चा माल असल्याने राज्यातील ३०-४० लाख कापूस उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे फायदा होणार आहे.गेल्या काही वर्षात कीटकांच्या आव्हानामुळे हवामान बदलामुळे कापसाचे उत्पादन कमी झाले आहे अथवा जेवढ्यास तेवढेच राहिले आहे अशा आव्हानांना तोंड देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर तातडीने करणे गरजेचे आहे. कापसाची उत्पादकता वाढविण्यासाठी, कच्चा मालाचा सातत्यपूर्ण पुरवठा निश्चित करण्यासाठी नवीन किडींशी लढा देण्यासाठी प्रगत बीटी कापसाची अत्यंत गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
अकोल्याचे कापूस उत्पादक गणेश नानोटे यांनी सांगितले की बीटी कापसामधील क्राय1एसी विषाणूमुळे गुलाबी बोंडअळीचा प्रतिकार वाढत आहे.बीटी कापसामुळे उत्पादकता वाढली असली तरी किडीचा प्रादुर्भाव देखील होत आहे. भारताने जुनी तंत्रज्ञान मर्यादा ओलांडून आधुनिक कृषी आव्हानांना तोंड देणारे नवीन वाण स्वीकारायला हवेत,असे सांगितले. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्राझीलमध्ये आधीच तणनाशक सहन करू शकणारे बीटी (एचटीबीटी) कापूस वाण उपलब्ध आहे, मग भारतीय शेतकऱ्यांना तेच तंत्रज्ञान का मिळू नये? असा प्रश्न उपस्थित केला.
हा विषय केवळ विज्ञानावर आधारित नाही, तर तंत्रज्ञान निवडीच्या हक्काशी संबंधित आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील खैरगाव येथील प्रगतशील शेतकरी नेमराज जगन्नाथ राजूरकर यांनी अनुभव सांगताना म्हटले, मी गेल्या ३० वर्षांपासून कापूस पिकवतो आहे. २००० च्या सुरुवातीला कापसाचे उत्पादन घसरले होते, पण बीटी वाण आल्यामुळे शेतकरी तारल्या गेला भारत जगातील प्रमुख कापूस निर्यातदार बनला. जैव तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांना समृद्धी मिळवून देण्यासह अन्न, वस्त्र, पशुखाद्याची गरज भागवण्यास मदत केली आहे.
राजूरकर यांनी अनुभवाच्या आधारे जैवतंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रात झालेले आमूलाग्र बदलाव उपस्थितांना सांगितले
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांद्वारे जैवतंत्रज्ञानाची मागणी
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांद्वारे जैवतंत्रज्ञानाची मागणी
जागतिक स्पर्धेत टिकाव लागण्यासाठी कापसाचे उत्पादन वाढविण्यावर भरनॅशनल फार्मर्स एम्पॉवरमेंट इनिशिएटिव्ह अर्थात एनएफईआयच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत शाश्वत उत्पादनक्षम शेतीसाठी जैव तंत्रज्ञानाच्या महत्त्वावर भर दिला.
विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी जैव तंत्रज्ञानासह अनुवांशिकरित्या सुधारित (जीएम) वाणांची पिके उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
जागतिक स्पर्धेत टिकाव लागण्यासाठी कापसाचे उत्पादन वाढविण्यावर भरनॅशनल फार्मर्स एम्पॉवरमेंट इनिशिएटिव्ह अर्थात एनएफईआयच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत शाश्वत उत्पादनक्षम शेतीसाठी जैव तंत्रज्ञानाच्या महत्त्वावर भर दिला.
विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी जैव तंत्रज्ञानासह अनुवांशिकरित्या सुधारित (जीएम) वाणांची पिके उपलब्ध करून देण्याची मागणी केली.