AROGYA

स्थूलतेच्या महामारीशी सामना: डॉ. जयेश तिमाने यांचा दृष्टिकोन आणि उपाय

Nagpur Media News 04 Mar, 2025
स्थूलतेच्या महामारीशी सामना: डॉ. जयेश तिमाने यांचा दृष्टिकोन आणि उपाय
अंतःरुग्ण औषधोपचार अतिदक्षता विभाग तज्ञ असल्याने भारतीयांमध्ये वाढत चाललेला लठ्ठपणा म्हणजेच स्थूलतेचे चिंताजनक प्रमाण मी प्रत्यक्षात बघितले आहे. गेल्या काही वर्षांत या समस्येने देशभरात उग्र रूप धारण केले आहे.
नागपूर; अंतःरुग्ण औषधोपचार अतिदक्षता विभाग तज्ञ असल्याने भारतीयांमध्ये वाढत चाललेला लठ्ठपणा म्हणजेच स्थूलतेचे चिंताजनक प्रमाण प्रत्यक्षात बघितले आहे. गेल्या काही वर्षांत या समस्येने देशभरात उग्र रूप धारण केले आहे.सध्याच्या आकडेवारीनुसार, भारतातील सुमारे ४१% प्रौढ २०% मुले अतिवजन किंवा स्थूलतेच्या श्रेणीत मोडतात. ही स्थिती केवळ आकडेवारीपुरती मर्यादित न राहता सार्वजनिक आरोग्यावर याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अनुमानानुसार, पुढील काही वर्षांत ही समस्या अधिक वाढण्याची शक्यता आहे.
स्थूलता ही वर्तणुक, पर्यावरणीय आनुवंशिक घटकांसारख्या अनेकांगी घटकांमुळे निर्माण होणारी स्थिती आहे. भारतातील शहरी भागात तथाकथित समृद्ध जीवनशैलीमुळे अतिसाखरेचे प्रमाण असलेले हानिकारक चरबीयुक्त प्रोसेस्ड फूड खाण्याचे प्रमाण वाढले आहे. याशिवाय, तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे घरून काम करण्याच्या (वर्क फ्रॉम होम) पद्धतीमुळे सर्वच वयोगटांमध्ये शारीरिक हालचालीचे प्रमाण कमी झाले आहे. आजकाल सुविधांचा हव्यास सुलभ जीवनशैलीमुळे पूर्वी पोषणमूल्यांनी भरलेले संतुलित आहार सक्रिय जीवनशैली महत्त्वाची मानणारी भारतीय संस्कृती आपली पारंपरिक आरोग्यदायी जीवनशैली मागे पडत आहे.
स्थूलतेचे आरोग्यावर होणारे परिणाम समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. स्थुलतेमुळे मधुमेह , उच्च रक्तदाब हायपरटेन्शन हृदयरोग हृदयविकाराचा झटका, काही प्रकारच्या कर्करोगाच्या समस्या उद्भवतात. याशिवाय, स्थूलता जीवनाच्या गुणवत्तेवर देखील परिणाम करू शकते ज्यामुळे तीव्र मानसिक तणाव, नैराश्य आत्मविश्वासासंबंधीच्या समस्या निर्माण होऊ शकतात. स्थूलतेची समस्या उद्भवण्यापूर्वीच आपल्या शरीराचे वजन आरोग्य नियमितपणे तपासणे अत्यावश्यक आहे.
वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी लठ्ठपणा टाळण्यासाठी नियमितपणे स्वतःचे मूल्यांकन करणे गरजेचे आहे. यामध्ये बीएमआय म्हणजेच बॉडी मास इंडेक्स मोजणे गरजेचे आहे. हे मोजण्याचे सूत्र असे आहे गुगलवर उपलब्ध आहे. बीएमआय जर २५ ते २९.९च्या दरम्यान असेल तर ते अतिवजनाच्या श्रेणीत मोडते. बीएमआय जर ३० किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर स्थूलता समजल्या जाते. यासोबतच कंबरेचा घेर मोजल्याने देखील स्थूलतेचा अंदाज येतो.
Previous Story Next Story