नागपूर,: गँगरीन-सुपीरियर व मेसेन्टेरिक व्हेन थ्रोम्बोसिस-एसएमव्हीमुळे हा आजार झाल्याचे निदान झाले
पोटातील मुख्य रक्तवाहिनी असलेल्या सुपीरियर मेसेन्टेरिक व्हेनमध्ये गाठी मुळे तरुण पुरुष रुग्णामध्ये आतड्यांना होणारी इस्केमिया अर्थात रक्तवाहिनीतील अडथळ्यामुळे आतड्यांना गॅंगरीन झाल्याचे प्रकरण आढळून आले आहे. डॉ. अंकुर मिश्रा,
कन्सल्टंट-जनरल आणि लॅपरोस्कोपिक सर्जन, वोक्हार्ट हॉस्पिटल, नागपूर यांनी या विषयी माहिती दिली.सुपीरियर मेसेन्टेरिक व्हेन थ्रोम्बोसिस हा एक दुर्मिळ जीवघेणा आजार आहे. या आजारात सुपीरियर किंवा इन्फिरियर मेसेन्टेरिक व्हेन किंवा शाखांमध्ये गाठी किंवा अडथळा (थ्रोम्बोसिस) निर्माण होतो. त्यामुळे अचानक तीव्र पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. काही वेळेस हा आजार पोटाच्या स्कॅनमध्ये सहजगत्या समोर येतो.
हा विकार ५,००० ते १५,००० रुग्णांमध्ये एका रुग्णात आपत्कालीन शस्त्रक्रियेच्या १,००० प्रकरणांमध्ये एका प्रकरणात दिसतो. गेल्या ४० वर्षांत सिटी स्कॅन आणि डायग्नोस्टिक लॅपरोस्कोपी यांसारख्या आधुनिक निदान पद्धतींमुळे या आजाराचे निदान होऊ लागले आहे. आजार कोणत्याही वयोगटात दिसू शकतो, पण तो प्रामुख्याने पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात दिसतो विशेषतः ५०-६० वर्षांच्या लोकांमध्ये जास्त आढळतो.
या आजाराची काही ठोस कारण असू शकते, जसे की -पोटाच्या आसपासच्या अवयवांचा कर्करोग,जळजळ,यकृत सिरोसिस किंवा पोर्टल व्हेन थ्रोम्बोसिस. मात्र काही वेळेस ठोस कारण आढळत नाही. त्यामुळे योग्य उपचार ठरवणे कठीण होते. हा आजार अचानक किंवा उपसर्गजन्य स्वरूपात उद्भवताना दिसतो आणि तीव्र मेसेन्टेरिक आर्टेरियल इस्केमियासारखी लक्षणे दर्शवू शकतो. बहुतेक वेळा लक्षणे गंभीर नसतात, त्यामुळे निदान उशिरा होते. ऱ्ही व इतर संशोधकांच्या अभ्यासानुसार ७५ टक्के रुग्णांना ४८ तासांहून अधिक काळ लक्षणे जाणवत होती, पण निदान उशिरा झाले. त्यामुळे थ्रोम्बस (गाठी निर्माण होणे) ची स्थिती उदभवली आणि आतड्यांवरील परिणाम विभिन्न प्रकारे दिसू लागले.
तरुण रुग्णामध्ये आढळून आला पोटातील आतड्यांना होणारा गँगरीन-सुपीरियर मेसेन्टेरिक व्हेन
तरुण रुग्णामध्ये आढळून आला पोटातील आतड्यांना होणारा गँगरीन-सुपीरियर
मेसेन्टेरिक व्हेन थ्रोम्बोसिस-एसएमव्हीमुळे हा आजार झाल्याचे निदान
पोटातील मुख्य रक्तवाहिनी असलेल्या सुपीरियर मेसेन्टेरिक व्हेनमध्ये गाठी निर्माण झाल्यामुळे तरुण पुरुष रुग्णामध्ये आतड्यांना होणारी इस्केमिया अर्थात रक्तवाहिनीतील अडथळ्यामुळे आतड्यांना गॅंगरीन झाल्याचे प्रकरण आढळून आले आहे.
,
डॉ. अंकुर मिश्रा
मेसेन्टेरिक व्हेन थ्रोम्बोसिस-एसएमव्हीमुळे हा आजार झाल्याचे निदान
पोटातील मुख्य रक्तवाहिनी असलेल्या सुपीरियर मेसेन्टेरिक व्हेनमध्ये गाठी निर्माण झाल्यामुळे तरुण पुरुष रुग्णामध्ये आतड्यांना होणारी इस्केमिया अर्थात रक्तवाहिनीतील अडथळ्यामुळे आतड्यांना गॅंगरीन झाल्याचे प्रकरण आढळून आले आहे.
,
डॉ. अंकुर मिश्रा