AROGYA

वोक्हार्ट हॉस्पिटल, नागपूर एक्सलन्स इन क्रिटिकल केअर अवॉर्ड’ ने सन्मानित

Nagpur Media News 17 Feb, 2025
वोक्हार्ट हॉस्पिटल, नागपूर एक्सलन्स इन क्रिटिकल केअर अवॉर्ड’ ने सन्मानित
वोक्हार्ट हॉस्पिटल, नागपूर एक्सलन्स इन क्रिटिकल केअर अवॉर्ड’ ने सन्मानित क्रिटिकल केअरमध्ये नवा मापदंड स्थापित पुरस्कार केवळ वैद्यकीय उत्कृष्टतेचा बहुमान नसून, दररोज अगणित रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी अहोरात्र झटणारे आमचे डॉक्टर, परिचारिका आरोग्य सेवा देणाऱ्या तज्ञांच्या अथक परिश्रमांचे प्रतीक आहे, असे वोक्हार्ट हॉस्पिटल, नागपूरचे केंद्र प्रमुख रवी बागली म्हणाले
नागपूर,; मध्य भारतातील अग्रगण्य आरोग्यसेवा संस्था असलेले वोक्हार्ट हॉस्पिटल, नागपूरला असोसिएशन ऑफ हेल्थकेअर प्रोव्हायडर्स इंडियाने (एएचपीआय) प्रतिष्ठित अशा एक्सलन्स इन क्रिटिकल केअर अवॉर्ड सन्मानाने गौरवान्वित केले आहे. या पुरस्काराने रुग्णसेवेतील सातत्यपूर्ण उत्कृष्टतेला अधोरेखित केले आहे व महाराष्ट्रातील अन्य भागांमध्ये उत्कृष्ट क्रिटिकल केअर सेवा प्रदान करणारे आघाडीचे रुग्णालय म्हणून प्रस्थापित केले आहे.गंभीर आजाराने त्रस्त रुग्णांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्याच्या कटिबद्धतेला या सन्मानाने अधिक दृढ केले आहे. एएचपीआयकडून मिळालेली ही मान्यता आमच्या उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा, सुरक्षितता रुग्ण-केंद्रित दृष्टिकोनाची पोचपावती आहे. हा पुरस्कार केवळ वैद्यकीय उत्कृष्टतेचा बहुमान नसून, दररोज अगणित रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी अहोरात्र झटणारे आमचे डॉक्टर, परिचारिका आरोग्य सेवा देणाऱ्या तज्ञांच्या अथक परिश्रमांचे प्रतीक आहे, असे वोक्हार्ट हॉस्पिटल, नागपूरचे केंद्र प्रमुख रवी बागली म्हणाले.
वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये क्रिटिकल केअर हे आरोग्यसेवेच्या मूलभूत उद्दीष्टांपैकी एक आहे. रुग्णालयाने अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, भक्कम पायाभूत सुविधा, तसेच कुशल वैद्यकीय तज्ञांना नेमण्यात सातत्याने गुंतवणूक केली आहे, ज्यामुळे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा देणे शक्य झाले आहे. प्रगत मॉनिटरिंग प्रणाली, व्हेंटिलेटर्स लाइफ-सपोर्ट मशीन यांनी सज्ज असलेल्या क्रिटिकल केअर युनिटमध्ये प्राणघातक आपत्कालीन परिस्थितीत देखील रुग्णांना सर्वोत्तम उपचार मिळतात.
Previous Story Next Story