नागपूर, ,महाकुंभ मेळा हा सनातनच्या एकतेचा योग असल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्संग फाऊंडेशन सं तरयोजित आणि व्हॅल्युएबल ग्रुप तर्फे आयोजित महाकुंभप्रयाग योग सोहळ्यात केले. नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. जगाच्या पाठीवर आस्थेचा एवढा भव्य संगम आजवर कोणत्याही देशाने बघितला नाही. भारतीय संस्कृती सभ्यतेमुळे हजारो वर्षांपासून हा संगम सनातन धर्माला मानणाऱ्या प्रत्येक घटकांना जात, धर्म, भाषा, पंथ विसरून एकत्रित आणत दिव्य अनुभव देतो, असेही ते म्हणाले.
प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात ज्या नागरिकांना त्रिवेणी संगमावर पवित्रस्नानाचा लाभ घेता आला नाही त्या नागरिकांकरिता हा विशेष पर्वणी सोहळा आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त प्रयागराज संगमाचे हजारो लिटर पवित्र जल नागपूरमध्ये आणण्यात आले होते. व्हॅल्युएबल ग्रुपचे अमेय हेटे यांच्या वडिलांच्या संकल्पनेतून शनिवार १५ फेब्रुवारी आणि रविवार १६ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेला हा दोन दिवसीय पवित्र उत्सव नागपूरकरांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, भक्ती संगीत, सत्संग, कीर्तन, भजन प्रवचनाची पर्वणी घेऊन आला असल्याचे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले.
महाकुंभ हा सनातनच्या एकतेचा योग : देवेंद्र फडणवीस
महाकुंभ हा सनातनच्या एकतेचा योग
महाकुंभप्रयाग योग नागपूरकरांसाठी ठरला प्रयागराज योग - व्हॅल्युएबल ग्रुप आणि सत्संग फाऊंडेशनतर्फे आयोजन केल्याबद्दल राज्याचे मुखमंत्री मा देवंद्र फडणवीस यांनी आभार मानले व अभिनंदन केले या प्रस्तावाला कसलीही संधी न दवडता हिरवी झेंडी दिली आणि रेशिम बाग ला हा योग घडवून आला पाहिजे असा आग्रह व विनंती केली अगदी कमी अवधीत सुंदर कार्यक्रम चे आयोजन केले ही बाब कौतुकस्पद आहे