SMAMAJIK

संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त भांडेवाडी ला दिव्य भव्य साप्ताहिक महोत्सव

Nagpur Media News 16 Feb, 2025
संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त भांडेवाडी ला दिव्य भव्य साप्ताहिक महोत्सव
संत गजानन महाराज प्रगट दिना निमित्य श्री संत गजानन महाराज मंदिर सेवा सेवा समिती भांडेवाडी द्वारा दिनांक 13 ते 20 फेब्रुवारी दरम्यान प्रगट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या साप्ताहिक महोत्सवाला यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी प्रवीण काकडे पृथ्वीराज मोटघरे व अन्य सदस्य गण अहोरात्र परिश्रम घेत आहेत
नागपूर .. संत गजानन महाराज प्रगट दिनाचे ओचित्य साधून श्री संत गजानन महाराज मंदिर सेवा समिती भांडेवाडी द्वारा दरवर्षी प्रमाणे यंदा ही थाटात साप्ताहिक प्रगट दीन महोत्सव साजरा होत आहे सलग ही 12 वे वर्ष आहे 13 ते 20 फेब्रुवारी दरम्यान भांडेवाडी येथे विविध धार्मिक कार्यक्रम चे आयोजन केले आहे दररोज राम कथा व हरिपाठ चे आयोजन केले आहे भक्ताना संबोधित करण्यासाठी हरिभक्त शंकर कावळे आशीर वचन देणार आहेत सलग 13 ते 20 फेब्रु वारी सांयकाळी 7 वाजेपासून तर रात्री 11 वाजेपर्यंत रामकथा व हरिपाठ या संगीतमय कार्यक्रमा ने भाविकांना संदेश देणार आहेत राम जन्म पासून तर राजा दशरथ याचा प्रत्यक्ष इतिहास ते या माध्यमातून घडवणार आहेत शंकर कावळे हे दरवर्षी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून अशीर वचन देतात त्याच्या व्याख्यान व मधुर वाणी ने भांडेवाडी परिसरातील भाविक हे सत्कर्मी लागले तर काही व्यसन मुक्त झाले त्याच्या वाणीत गोडवा व मधुरता आहे त्याची वाणी ऐकण्यासाठी मंदिर परिसरात अफाट गर्दी होते एकदा भाविक आला की वाणी ला विराम मिळेपर्यंत जागा सोडत नाही हे मात्र विशेष आहे
गजानन महाराज प्रगट दीन महोत्सव ला 13 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली असून 13 फेब्रुवारी ला सकाळी घटस्थापना व संध्याकाळी श्री राम कथा घेण्यात आली
14 फेब्रुवारी ला सकाळी 5 वाजता काकड आरती व साय काळी 5 वाजता पासून हरिपाठ चे आयोजन हरिभक्त शंकर कावळे यानी केले 15 फेब्रुवारी ला सायकाळी 7 वाजेपासून राम कथा घेण्यात आली व रामजन्म कसा झाला या बाबत मार्गदर्शन केले
Previous Story Next Story