१५-१६ फेब्रुवारीदरम्यान रेशीमबाग मैदान येथे भव्य अध्यात्मिक अनुभूतीचा योग
महाकुंभातील संगम जल नागपुरात,
संगम जल अभिषेक सोहळ्या ला सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची उपस्थिती
नागपूर विदर्भातील भाविकांना प्रयागराज ला जाण्याची गरज नाही रेशिमबाग मैदान ला संगम जल द्वारा आध्यात्मिक अनुभूती चा योग मिळणार आहे
केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी राज्याचे मुख्यमंत्री मां देवेंद्र फडणवीस व सास्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या अथक प्रयत्नाने भक्ताना प्रयागराज च्या धर्तीवर संगम जल द्वारा अनुभूतीचा योग या दोन दिवसात 15 व 16 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे
16 फेब्रुवारी ला सकाळी 10 वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत

नागपूर : प्रयागराज येथे सध्या सुरू असलेल्या महाकुंभादरम्यान त्रिवेणी संगमावर करोडो लोक पवित्र स्नानाचा लाभ घेत आहेत. पण ज्यांना तेथे जाणे शक्य नाही अशांनाही या पवित्र संगम जलाच्या दर्शनाची अनुभूती घेता यावी, या अनुषंगाने तेथील हजारो लिटर पवित्र जल नागपूर येथे आणण्यात आले असून शनिवार १५ फेब्रुवारी रविवार १६ फेब्रुवारी या दोन दिवशी रेशीमबाग मैदान येथे भव्य दिव्य अध्यात्मिक वातावरणात या पवित्र जलाचा वर्षाव भाविकांवर केला जात आहे. या समारंभात शनिवारी दुपारी १ वाजता महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री श्री आशिष शेलार सहभागी झाले त्यांनी महाआरतीमध्ये सहभाग घेतला. शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्या भक्तीसंध्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रविवारी सकाळी १० वाजता महाआरतीमध्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार आहेत. भाविकांना दिव्य अनुभूती मिळावी, याकरिता व्हॅल्युएबल ग्रुपच्या वतीने आयोजित आणि सत्संग फाउंडेशनच्या सहयोगाने या भव्य महाकुंभप्रयाग योग मध्ये दोन्ही दिवस सांस्कृतिक कार्यक्रम, भक्ती संगीत, सत्संग, किर्तन, भजन, प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमांसोबतच महाराष्ट्रातील प्रसिद्ध ब्रम्हवृंदाद्वारे शिवशक्ती याग संतांच्या पादुका व जलकुंभ अभिषेक, पवित्र जलाभिषेक असा भरगच्च कार्यक्रम भाविकांसाठी आयोजित करण्यात आला आहे. आधुनिक तंत्राच्या सहायाने उपस्थित भाविकांवर प्रयाग येथून आलेल्या पवित्र तीर्थजलाचा वर्षाव केला जात आहे. दोन्ही दिवशी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत हे अध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.