AROGYA

विदर्भात प्रथमच पार्किन्सनसाठी डीप ब्रेन स्टिम्युलेशन शस्त्रक्रिया

Nagpur Media News 25 Dec, 2024
विदर्भात प्रथमच पार्किन्सनसाठी डीप ब्रेन स्टिम्युलेशन शस्त्रक्रिया
52 वर्षीय गेडाम हा रुग्ण पार्किंगसंस आजाराने त्रस्त होता त्याचे योग्य निदान व उपचार व्होकार्ट हॉस्पिटल टीम ने शस्त्र क्रिया करून केली यामुळे मेडी सीन चां त्रास कमी झाला रोबोट द्वारा शस्त्र क्रिया करण्यात आली रुग्णाला गुंगी न देता सर्जरी करता येते हे विशेष डॉ बलदिया यानी प्रक्रिया पार पाडली
नागपूर - न्यूरोलॉजिकल क्षेत्रातील अत्याधुनिक उपचारांच्या दिशेने महत्त्वपूर्ण टप्पा गाठत, विदर्भात पार्किन्सनच्या आजारासाठी पहिली डीप ब्रेन स्टिम्युलेशन (डीबीएस) शस्त्रक्रिया वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे करण्यात आली. या ऐतिहासिक कामगिरीमुळे विदर्भ भारतात अत्याधुनिक वैद्यकीय उपचारांचे केंद्र म्हणून नावलौकिक आहे.
वोक्हार्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या तज्ञ टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. या टीमचे नेतृत्व प्रसिद्ध न्युरोसर्जन प्रा. डॉ. मनीष बल्दिया यांनी केले. पार्किन्सन आजाराशी लढा देत असलेल्या रुग्णांसाठी नवीन आशेचा किरण दाखवला आहे. डीप ब्रेन स्टिम्युलेशन (डीबीएस) ही शस्त्रक्रिया असून, ती मेंदूमध्ये विशिष्ट भागांवर विद्युत प्रवाह पाठवणारे उपकरण प्रत्यारोपित करून रुग्णांच्या कापऱ्या हातांचे कंप, स्नायूंची कडकपणा आणि ब्रॅडीकिनेशिया यासारख्या हालचालीशी संबंधित लक्षणांवर नियंत्रण ठेवते. डॉ. मनीष बल्दिया, प्रमुख न्यूरोसर्जन यांनी शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली डीप ब्रेन स्टिम्युलेशनने जागतिक स्तरावर पार्किन्सन रोगाच्या उपचार पद्धतींमध्ये मोठा बदल घडवून आणला आहे. ही एक कमी आक्रमक शस्त्रक्रिया आहे जी औषधांना प्रभावीपणे प्रतिसाद देत नसलेल्या रुग्णांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा करते. ही शस्त्रक्रिया सुरक्षित असून ती रुग्णाला जागे ठेवून केली जाते, ज्यामुळे रुग्ण स्वतःच त्याच्या लक्षणांमध्ये सुधारणा झाल्याचे सांगतो. या शस्त्रक्रियेसाठी पुनर्वसन कालावधी नाही ही शस्त्रक्रिया 80 वर्षांपर्यंत सुरक्षितपणे करता येते. डॉ. बलदिया यांनी सांगितले की, जितक्या लवकर ही शस्त्रक्रिया केली जाईल तितके चांगले आणि दीर्घकालीन परिणाम मिळतील, ज्यामुळे औषधांचा वापर पूर्णपणे थांबवता येईल. डीबीएसचा उपयोग डिस्टोनिया, राइटरचा क्रॅम्प, एपिलेप्सी, हंटिंग्टन कोरिया, एससीए-12, व्यसन, नैराश्य ओसीडीसारख्या अनेक इतर आजारांसाठी देखील करता येतो
Previous Story Next Story