AROGYA

दिवाळी नंतर शरीर कसे डीटॉक्स करावे- स्वाती अवस्थी, चीफ डायटीशियन, वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर

Nagpur Media News 09 Nov, 2024
दिवाळी नंतर  शरीर कसे डीटॉक्स करावे- स्वाती अवस्थी, चीफ डायटीशियन, वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर
रात्री चांगली झोप ही शरीर मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे. बरेच लोक याकडे दुर्लक्ष करतात. ताजे, उत्साही तणावमुक्त राहण्यासाठी किमान 7-8 तास झोपण्याची सवय शरिराला लावा.
दिवाळीनंतर शरिराचे डिटॉक्स हे उपाशीपोटी नव्हे तर उत्तम प्रमाणात नैसर्गिक, घरी शिजवलेले अन्न, योग्य विश्रांती, ध्यान पाण्याचा शरिराला पुरेसा पुरवठ्यामुळे केले पाहिजे.
नागपूर -भारतात बहुप्रतिक्षित साजरा होणार सण म्हणजे दिवाळी. रोषणाईल, पणत्या, फटाके आणि खाद्यपदार्थांचे या सणातविशेष आकर्षण असते. विशेषतः यात मिठाई, चकली, मूठभर चिवडा तोंडभर लाडू यावर यथेच्छ ताव मारला जातो. दिपावलीचा हा मुख्य सण नुकताच संपला आहे. त्यामुळे मागचा आठवडा आनंददायी वातावरणासोबतच चविष्ट पदार्थांच्या गोडवा देऊन गेला आहे. पार्ट्या, कौटुंबिक मेळावे, मित्र- मंडळीची मौजमजा उत्सवांनी सण साजरा करून झाला आहे.
दिवाळी सणाच्या काळात फोडले जाणारे फटाके, धूर, वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण, तळलेले पदार्थ मिठाई खाल्ल्याने उष्मांकाने भरलेल्या अन्नपदार्थांमुळे शरीर मन आळसावले असते. वर्षातून एकदा हा आनंद लुटणे योग्य असले तरी, आता शरीराला आवश्यक विश्रांती देण्याची वेळ आली आहे.
Previous Story Next Story