RAJKIYA

बसप ने उमेदवारी नाकारताच आझाद समाज पक्षकडून उमेदवारी अर्ज दाखल - शशीकांत मेश्राम

Nagpur Media News 31 Oct, 2024
बसप ने उमेदवारी नाकारताच आझाद समाज पक्षकडून उमेदवारी अर्ज दाखल - शशीकांत मेश्राम
शशिकांत मेश्राम गेल्या अनेक वर्षांपासून बसप मध्ये संघटन बळकट करण्यास सिहाचा वाटा आहे कांशीराम जी यांच्या नेतृत्वात निळा झेंडा हाती घेउन उमरेड विधानसभा मतदारसंघात घरोघरी डॉ आंबेडकरांचा हत्ती अशी ओळख निर्माण केली दिवस रात्र पायाला भिंगरी बांधून बहुजन समाज पक्षाला मोठे केले पण बसप नेत्यांनी मात्र उमेदवारी साठी डावलले म्हणूज त्यानी निळा झेंडा आझाद समाज पार्टी कडून नामांकन सादर केले
नागपूर - महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहत असून उमेदवारी वरून रणकंद प्रत्येक राजकीय पक्षात निर्माण झाल्याचे चित्र होते उमरेड विधानसभा मतदार संघ हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव मतदार संघ असून या मतदारसंघात इच्छुकांनी होर्डिंग बॅनर ने विद्रुपीकरण केले हवसे गवसे पावसाळी मेंढक बाहेर पडले गुडघ्याला बार्शीग बांधून प्रचार प्रसार होत होता भाजप ने तर अगदी शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर केली अतिशय संवेदनशील असणारा हा मतदार संघात अनुसूचित जातीचे प्राबल्य आहे बसप चे कॅडर मजबूत आहे या मतदारसंघात दोन जिल्हा परिषद सदस्य निवडून आले बसप ला तिसऱ्या क्रमांकाची मताधिक्य मिळत आले बसप मध्ये दावेदार ची रांग होती त्यात शशिकांत मेश्राम गत पाच वर्षांपासून मतदारसंघात डेरा टाकून बसले होते जनतेच्या समस्या सोडवीत असून गोरगरीब जनतेच्या पाठीशी होते दिवस रात्र जनसेवा हाच त्याचा धर्म होता सामान्य जनतेशी नाळ जुळली होती त्यानी आपली एक ओळख निर्माण केली व या जनतेच्या समर्थनार्थ आग्रहास्तव त्यानी बसप कडे उमेदवारी साठी मागणी केली पण एन वेळेवर त्यना बी फार्म मिळाला नाही
Previous Story Next Story