वर्ल्ड ट्रामा डे: जोखीम आणि प्रतिबंधात्मक उपाय : डॉ. रोमिल राठी
डोक्याला दुखापत होणे : हेल्मेट न वापरल्यामुळे मेंदूला गंभीर दुखापत (टीबीआय), मस्तिष्काघात किंवा कवटीचे फ्रॅक्चर होऊ शकते.फ्रॅक्चर होणे : जेव्हा बाईकस्वार त्यांच्या बाइकवरून पडतात किंवा त्यांची एखाद्या बाईकला टक्कर होते तेव्हा हात, पाय किंवा कॉलरबोन्सची हाडे फ्रॅक्चर होणे सामान्य बाब आहे.
नागपुर : डॉ. रोमिल राठी, एमबीबीएस, एमएस ऑर्थोपेडिक्स, वोक्हार्ट हॉस्पिटल, नागपूर वर्ल्ड ट्रामा दिनानिमित्त ट्रॉमाशी संबंधित धोकादायक दुखापतींबद्दल सांगितले, बाईकर्स, विशेषत:मोटारसायकल सायकल वापरणाऱ्या तरुणांना बाईक चालवण्याचा अनुभव नसणे, धोकादायक चीडखोर वागणूक योग्य संरक्षणात्मक गियर न वापरणे यासारख्या कारणांमुळे ट्रामा-संबंधित दुखापत होण्याचा धोका जास्त असतो. जेव्हा या व्यक्ती ट्रॉमा सेंटरमध्ये येतात तेव्हा सर्वात सामान्य दुखापतींमध्ये खालील जखमांचा समावेश असतो:डोक्याला दुखापत होणे : हेल्मेट न वापरल्यामुळे मेंदूला गंभीर दुखापत (टीबीआय), मस्तिष्काघात किंवा कवटीचे फ्रॅक्चर होऊ शकते. फ्रॅक्चर होणे : जेव्हा बाईकस्वार त्यांच्या बाइकवरून पडतात किंवा त्यांची एखाद्या बाईकला टक्कर होते तेव्हा हात, पाय किंवा कॉलरबोन्सची हाडे फ्रॅक्चर होणे सामान्य बाब आहे. पाठीच्या कण्याला दुखापत होणे : गंभीर अपघातांमुळे पाठीच्या कण्याला इजा पोहोचू शकते, ज्यामुळे पक्षाघात किंवा दीर्घकालीन अपंगत्व येऊ शकते. अंतर्गत जखम : बाइकवरून पडल्यामुळे किंवा टक्कर झाल्यामुळे आतील अवयवांचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव होऊ शकते किंवा फुफ्फुस पंक्चर होऊ शकतात. रोड रॅश : फुटपाथवर किंवा रस्त्यावर घसरल्यामुळे त्वचेवर रॅशेस येतात, जे सौम्य किंवा गंभीर असू शकतात, ज्यासाठी अनेकदा स्किन ग्राफ्ट्सची आवश्यकता असते