RAJKIYA

गोंडवाना गणतंत्र पार्टी व वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनिशी विधानसभा लढविणार

Nagpur Media News 07 Oct, 2024
गोंडवाना गणतंत्र पार्टी व वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनिशी विधानसभा लढविणार
गोंडवाना गणतत्र पार्टी व वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र विधानसभा तील 288 उमेदवार रिंगणात उतविनार असून आमच्या शिवाय सरकार स्थापन होणार नाही असाही दावा नागपूर येथे संपन्न झालेल्या आढावा बैठकीत हो प्रदेश अध्यक्ष हरीश यूईके यांनी केला या प्रसंगी मध्यप्रदेश चे पदाधिकारी व संभावित उमेदवार उपस्थित होते
या दोन पक्षांनी एकत्र निवडणूक रिंगणात उत् रणे म्हणजे कुण्या एका राजकीय पक्षाला लाभाचे समीकरण होऊन मिळणार अशी राजकीय चर्चा असल्याचे बोलल्या जात आहे याचा फटका काँग्रेस ला बसणार का?
नागपूर: गोंडवाना गंणतंत्र पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्यावतीने सरंपच भवन सिव्हिल लाईन नागपूर येथे नुकतीच आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीमध्ये हरीष उईके यांनी पत्रकारांना माहिती दिली की गोंडवाना गणतंत्र पार्टी, वंचित, बहुजन आघाडी, भारत आदिवासी पार्टी संघटितपने 2024 ची विधानसभा निवडणूक लढविणारच देशाला75 वर्ष स्वतंत्र होऊन झाले परंतु आजपर्यंत आदिवासीना आरक्षणचा काहीच फायदा मिळाला नाही. फक्त साडेतीन टक्के आरक्षण मिळाले. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आरक्षण ! बेरोजगारी, महागाई गोंडवाना विदर्भ राज्य अलग झाले पाहिजे. विदर्भ राज्य वेगळे झाले पाहिजे. ह्या मुद्द्याला घेऊन आढावा बैठक घेण्यात आली.आरक्षण ला घेऊन आदिवासी समाजाला जागरूक करून या सरकारला पायउतार करणार असल्याचां दावा व्यक्त केला
Previous Story Next Story