मुंबई- येथील देशातील सुस्थापित विश्वासप्राप्त ब्रँड अप्सरा आईस्क्रीमने कंपनीच्या ५३व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून नावीन्यपूर्ण उपक्रमाची घोषणा केली. ग्राहकाच्या चेहऱ्यावर आनंद स्मितहास्य साठी कंपनी ५३,००० मोफत आईस्क्रीमचे वितरण करणार आहे.मुस्कान हा उपक्रम ७८ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्टपासून मुंबई व पुण्यात सुरू होणार आहे. त्यानंतर अन्य शहरांमध्ये टप्प्याटप्याने तो सुरू करण्यात येणार आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या उपक्रमांतर्गत कंपनी ५३,००० आईस्क्रीमचे वितरण करणार आहे.हे सुमारे चार टन आईस्क्रीम आहे. देशातील ९ राज्ये आणि २५ शहरांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येईल. विविध स्वयंसेवी संस्था, अनाथालये, वृद्धाश्रम सरकारी व गैर-सरकारी क्षेत्रांमधील विविध प्रतिष्ठानांमध्ये हे आईस्क्रीम वितरित करण्यात येईल. लायन्स क्लब, लिओ, लायन इंटरनॅशनल, स्वदेस फाऊंडेशन, लिओ इंटरनॅशनल, लिओ क्लब ऑफ अंधेरी अचिव्हर्स, रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट, श्री नित्यानंद एज्युकेशन ट्रस्ट यासारख्या आघाडीच्या सामाजिक संस्था देखील या उपक्रमाचा एक भाग होणार आहेत.
चेहऱ्यावर स्मितहास्य उमटविणे व त्यांना आनंद देणारा स्कूप वाटणे, हे या उपक्रमाचे लक्ष्य आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या शुभ प्रसंगी गोडवा आणणे हाही त्याचा उद्देश आहे.याप्रसंगी अप्सरा आईस्क्रीमचे संस्थापक व भागीदार नेमचंद शहा म्हणाले, समाजाच्या विविध घटकांमध्ये आनंद पसरवणे ५३ वा वर्धापनदिन साजरा करणे हे मुस्कान चे मुख्य लक्ष्य आहे. या उपक्रमाचा आरंभ १५ ऑगस्ट रोजी म्हणजे ७८ व्या स्वातंत्र्यदिनी होणार आहे. ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. चेहऱ्यावर स्मितहास्य पाहून त्यांचा दिवस संस्मरणीय करून अत्यंत आनंद होतो. समाजाची परतफेड करणे लोकांच्या जीवनात आनंदाची भर घालणे, यावर आमचा दाट विश्वास आहे.
अप्सरा आईस्क्रीमचे व्यवस्थापकीय भागीदार .केयूर शाह म्हणाले, समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचणे यावर या उपक्रमाचा संपूर्ण भर आहे. वर्धापन दिन ७८ व्या स्वातंत्र्यदिनी साजरा करणार आहोत, अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. ज्यांना गरज आहे त्यांच्यामध्ये हास्य आनंद पसरविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यातून सामाजिक जबाबदारीबद्दल अप्सराची कटिबद्धता दिसून येते. मुस्कान या उपक्रमाच्या माध्यमातून अनेकांचे कल्याण आनंद यांच्यासाठी योगदान देऊन अप्सरा आईस्क्रीम वर्धापनदिन संस्मरणीय करत आहे
अप्सरा आईस्क्रीम ५3 व्या वर्धापनदिनानिमित्त 15 ऑगस्ट पासून मुस्कान उपक्रम.
नेमचंद शाह, संस्थापक भागीदार, अप्सरा आईस्क्रीम्स केयूर शाह, व्यवस्थापकीय भागीदार, अप्सरा आईस्क्रीम्स यांनी ५३ व्या वर्धापन दिनानिमित्त मुस्कान नावाचा उपक्रम सुरू केला.१५ ऑगस्ट रोजी ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवानिमित्त होणार उपक्रमाचा शुभारंभ.देशभर आनंदाचा प्रसार करण्यासाठी ५३,००० मोफत आईस्क्रीमचे करणार वितरण.