UDYOJAGTA

रामदेवबाबा सॉल्व्हण्‍ट लिमिटेड आयपीओ १५ एप्रिल २०२४ ला लॉन्च

Nagpur Media News 13 Apr, 2024
रामदेवबाबा  सॉल्व्हण्‍ट लिमिटेड आयपीओ १५ एप्रिल २०२४ ला लॉन्च
रामदेवबाबा सॉल्व्हेंट लिमिटेड, २००८ मध्ये स्थापन झालेली नागपूर-आधारित कंपनी, फिजिकल रिफाइन्ड राइस ब्रॅन ऑइलचे उत्पादन, वितरण, विपणन विक्री करण्यात अग्रेसर आहे.
नागपूर, - रामदेवबाबा सॉल्‍व्‍हण्‍ट लिमिटेड ही नागपूरमध्‍ये मुख्‍यालय असलेली, रिफाइन्‍ड राइस ब्रान ऑईलची उत्‍पादक व वितरक आहे. कंपनीने १५ एप्रिल २०२४ रोजी इनिशियल पब्लिक ऑफरिंग सादर करण्‍याची घोषणा केली आहे. कंपनीचा या आयपीओच्‍या माध्‍यमातून अपर प्राइस बँडमध्‍ये ५०.२७ कोटी रूपये निधी उभारनार आहे. इश्‍यू आकार १० रूपयांच्‍या दर्शनी किंमतीसह ५९,१३,६०० इक्विटी शेअर्स आहे.
आयपीओमधून प्राप्त होणारे निव्‍वळ उत्पन्, नवीन उत्‍पादन सुविधा ‍स्थापित करण्‍यासाठी, पूर्णत: किंवा अंशत: परताव्‍यासाठी, आमच्‍या कार्यरत भांडवल गरजा व सामान्‍य कॉर्पोरेट खर्च यासाठी वापरण्‍यात येईल. अँकर पोर्शनसाठी बोली १२ एप्रिल २०२४ रोजी सुरू होईल, इश्‍यू १५ एप्रिल २०२४ रोजी खुला होईल १८ एप्रिल २०२४ रोजी बंद होईल.
रामदेवबाबा सॉल्‍व्‍हण्‍ट लिमिटेडचे व्‍यवस्‍थापकीय संचालक निलेश सुरेश मोहटा म्‍हणाले, आगामी आयपीओची घोषणा करताना आनंद होत आहे, जो विकास प्रवासामधील महत्त्वाचा टप्‍पा आहे. या निर्णयामधून कंपनीच्‍या क्षमतांमधील विश्‍वास विस्‍तारीकरणासाठी नवीन संधींचा फायदा घेण्‍याप्रती कटिबद्धता दिसून येते.धोरणात्‍मकरित्‍या स्थित उत्‍पादन सुविधा दर्जात्‍मक नियंत्रणासाठी उत्तम व्‍यवस्‍थापनाने वाढती दृश्‍यमानता व बाजारपेठ उपस्थितीसाठी उत्तमरित्‍या स्थित ठेवले आहे. या नवीन चॅप्‍टरची सुरूवात करत आम्‍ही उद्योगामधील विकास व नाविन्‍यतेसाठी संधींचा फायदा होणार आहे.
Previous Story Next Story