नागपूर, - वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर ही काळजी नावीन्यपूर्णतेची परंपरा असलेली आरोग्य सेवा आहे हॉस्पिटल मध्य भारतातील रूग्णांसाठी वरदान ठरते. क्रिटिकल रूग्ण हाताळणाऱ्या वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूरने 17 वर्षांच्या मुलावर स्कार्लेस ब्रेनची यशस्वी सर्जरी केली. मिनिमली इन्व्हेसिव्ह न्यूरोसर्जरीच्या दिशेने प्रगती करत आहे जी अत्यंत कुशल प्रक्रियांपैकी एक आहे.
नागपुरातील एका प्राईम लोकेशनवर, रात्री उशिरा रस्ता ओलांडताना कारने धडक दिल्याने 17 वर्षीय मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यामुळे डोक्यातून रक्तस्राव झाला. वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर येथील डॉ. राहुल झामड, कन्सल्टंट - न्यूरोसर्जरी (ब्रेन स्पाइन सर्जन) मुलाचे मूल्यमापन केले तेव्हा लक्षात आले कि, संवेदना बदलल्या होत्या तो खूप चिडखोर झाला होता. रुग्णाच्या मेंदूचे तात्काळ सीटी स्कॅन करण्यात आले, ज्यामध्ये मेंदूच्या दोन्ही बाजूंना डोळ्याच्या अगदी वर डाव्या बाजूपेक्षा उजव्या बाजूला जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले.
डॉ. राहुल झामड, कन्सल्टंट - न्यूरोसर्जरी (ब्रेन आणि स्पाइन सर्जन), वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर, यांनी सांगितले की, नातेवाईकांचे काउंसलिंग केले परिस्थितीचे गांभीर्य सर्जरीच्या हस्तक्षेपाची गरज सांगितली. कारण रक्तस्त्राव कमी करून त्याचा लवकर परिणाम दाखवेल अशी ही एक जीव वाचवणारी सर्जरी होती. तो रुग्ण तरुण मुलगा असल्याने मेंदूमध्ये मोठे चीरे मारणे टाळायचे होते म्हणून आम्ही हा रक्तस्त्राव कमी करण्यासाठी मिनिमली इनवेसिव्ह न्यूरोसर्जरी समजावून सांगितली आवश्यक असल्यास मोठी सर्जरी करावी लागेल असेही सांगितले, ज्यावर कुटुंबांनी सहमती दिली. उजव्या डोळ्याच्या भुवयाच्या वर एक लहान चीरा केला डोळ्याच्या वरच्या हाडाचा छोटा भाग काढून टाकला, रक्त बाहेर काढण्यात आले. रक्त काढून टाकल्यानंतर मेंदूला आराम मिळाला हृदयाचे ठोके सुरळीत दिसून आले. चिरा मारलेला भाग बंद करताना मेंदूमध्ये रक्तस्राव होणार नाही याची काळजी घेण्यात आली. मुलाला 2 ते 3 दिवस आयसीयूमध्ये ठेवण्यात आले डिस्चार्ज करण्यापूर्वी आणखी 3 दिवस वॉर्डमध्ये ठेवण्यात आले. काही दिवसांनी मुलगा फॉलो-अप साठी आला तेव्हा त्याच्या उजव्या डोळ्याच्या दृष्टीच्या काही समस्या तसेच त्याचा चिडचिडेपणा कमी झालेला दिसून आला.
डॉ.राहुल झामड म्हणाले, मानवी मेंदूच्या अनेक प्रकारच्या आजारांवर मिनिमली इनवेसिव्ह ब्रेन सर्जरी आता शक्य झाली आहे. मिनिमली इनवेसिव्ह ब्रेन सर्जरीसह, ही प्रक्रिया आजूबाजूच्या ऊतींना कमीत कमी नुकसानासह झालेली जखम किंवा आजार तंतोतंत सुरक्षितपणे काढून टाकण्याचा किंवा उपचार करण्याचा प्रयत्न करते. यापैकी बऱ्याच सर्जरी लहान क्रॅनिओटॉमी प्रक्रियेद्वारे केल्या जाऊ शकतात ज्यामध्ये नाकपुड्यांमधून मेंदूचा क भाग उघडला जातो.
मेंदूवरील कोणतीही सर्जरी नाजूक असली तरी, मिनिमली इनवेसिव्ह सर्जरीमुळे रुग्णामध्ये मेंदूवरील गुंतागुंत होण्याची शक्यता कमी होते. या सर्जरी टेक्निकली कठीण असतात ट्यूमर किंवा मेंदूवर परिणाम करणाऱ्या इतर आजारांसाठी त्या योग्य नसतात. या रुग्णामध्ये रक्तस्राव होण्याचा बराचसा भाग मेंदूच्या एका बाजूला असल्याने, मिनिमली इनवेसिव्ह सर्जरीचा पर्याय निवडू शकलो. ज्यामुळे कवटीचा मोठा चीरा टाळण्यात आला रुग्ण लवकरात लवकर रिकव्हर होण्याचे खूप चांगले परिणाम दिसून आले
वोक्हार्ट हॉस्पिटल ला17 वर्षीय मुलावर अपघातग्रस्त स्कार्लेस ब्रेन सर्जरी यशस्वी
अभिनंदन दस्तेनवार, सेंटर हेड, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर म्हणाले, वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूरकडे अशी एक्सपर्ट येतज्ज्ञ डॉक्टरांची टीम आहे याचा अभिमान आहे. सामान्य माणसाला अत्यंत समर्पणाने मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर असतो.