AROGYA

फुफ्फुस स्वास्थ्य पुनर्वसन सुधृढ श्वसनाकडे वाटचाल हेच ध्येय : डॉ. अशोक अरबट

Nagpur Media News 18 Mar, 2024
फुफ्फुस स्वास्थ्य पुनर्वसन सुधृढ श्वसनाकडे वाटचाल  हेच  ध्येय : डॉ. अशोक अरबट
क्रिम्स हॉस्पिटल्समध्ये अत्याधुनिक पल्मोनरी रिहॅबिलिटेशन सेंटर आहे ज्यामध्ये पल्मोनोलॉजिस्ट, फिजिओलॉजिस्ट, मानसशास्त्रज्ञ, आहारतज्ञ परिचारिका यांचा समावेश आहे. फुफ्फुसाच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांचे आरोग्य सुधारावे म्हणून ते अविरतपणे झटत असतात.
नागपूर - मनुष्याच्या जन्मानंतर पहिली आयुष्यभर निरंतर चालणारी क्रिया म्हणजे श्वसन आहे जेवढी निरोगी फुफ्फुसे तेवढीच श्वसनसंस्था सुधृढ असते बदलत्या वातावरणात प्रदूषणयुगाच्या टोकावर उभे असताना फुफ्फुसांच्या आरोग्याची काळजी घेणे काळाची गरज बनली आहे.
फुफ्फुस पुनर्वसन (पल्मनरी रिहॅबिलिटेशन) सप्ताहांतर्गत दमा, अस्थमा, फुफ्फुसांचे विविध दुर्धर विकार श्वसनसंस्थेच्या आजारांपासून पीडित असणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्यावर प्रकाश टाकला जातो. शारीरिक सुदृढता, मानसिक सुदृढता आहाराचे व्यवस्थापन अशा तीन भागात फुफ्फुस स्वास्थ्य पुनर्वसन कार्यक्रम विभागला जातो. या तिन्ही आघाडींवर व्काळजी घेतली गेल्यास रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांनी कमी होऊ शकते.
क्रिम्स हॉस्पिटल्समध्ये अत्याधुनिक पल्मोनरी रिहॅबिलिटेशन सेंटर आहे ज्यामध्ये पल्मोनोलॉजिस्ट, फिजिओलॉजिस्ट, मानसशास्त्रज्ञ, आहारतज्ञ परिचारिका यांचा समावेश आहे. फुफ्फुसाच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांचे आरोग्य सुधारावे म्हणून ते अविरतपणे झटत असतात. पल्मोनरी रिहॅबिलिटेशन दरम्यान, डॉक्टर आरोग्य स्थिती समजून घेणे, औषधे व्यवस्थापित करणे, तुम्हाला श्वासोच्छवासाचे व्यायाम शिकवणे लक्षणे हाताळण्यास मदत करणे यावर लक्ष केंद्रित करतात. क्रिम्समध्ये सर्वसाधारण श्वसनसंबंधी चाचण्यांसह एंडोब्रोन्कियल अल्ट्रासाऊंड (ईबस), क्रायोथेरपी, थोरॅकोस्कोपी आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रिया अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत
Previous Story Next Story