वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर ला 57 वर्षीय रुग्णावर यशस्वी उपचार
डॉ. अक्षय सिंग, कन्सल्टन्ट-सीव्हीटीएस, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, सांगितले, योग्य उपचारांद्वारे हृदयविकाराचा त्रास असलेले रुग्ण दीर्घकाळ निरोगी राहू शकतात. नवीन प्रकारच्या ऑपरेशनद्वारे धमनीतील ब्लॉकेज दूर केले जाऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नागपूर, - आरोग्य सेवा क्षेत्रात अग्रगण्य असलेले वोक्हार्ट हॉस्पिटल नागपूर नवीन मेडिकल केस घेऊन आले. हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेली ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया चमत्कारच होता वोक्हार्ट हॉस्पिटल्सची समर्पित टीम ही सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याच्या त्यांच्या ध्येयाचा पुरावा आहे.57 वर्षीय पुरुष रुग्णाला अचानक श्वास घेण्यास त्रास व काम करताना छातीत हलके दुखणे अशी लक्षणे दिसून आली. तपासासाठी वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये डॉ.अक्षय सिंग यांच्याकडे पाठवण्यात आले. रुग्णाची तपासणी करण्यात आली कोरोनरी अँजिओग्राफी करण्यात आली. अँजिओग्राफी रिपोर्टमध्ये एलएडी लेफ्ट अँटीरियर डिसेंडिंग आर्टरी आरसीए राइट कोरोनरी आर्टरी चे क्रॉनिक टोटल ऑक्लुजन सीटीओअसल्याचे आढळून आले. दोन्ही मुख्य धमन्या पूर्ण ब्लॉक झाल्यामुळे मायोकार्डियमच्या क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी कार्डियाक एमआरआय करण्याचा निर्णय घेतला. कार्डियाक एमआरआय रिपोर्टमध्ये मायोकार्डियमची आंशिक क्षमता दिसून आली, पीटीसीए हा पर्याय नसल्यामुळे सीएबीजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. रुग्णाला संपूर्ण धमनी रिव्हॅस्क्युलरायझेशनसह सीएबीजी केले गेले.