UDYOJAGTA

विदर्भातून ५० हजार कोटींची निर्यात शक्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरीं

Nagpur Media News 29 Jan, 2024
विदर्भातून ५० हजार कोटींची निर्यात शक्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरीं
विदर्भात खारे गोडे दोन्ही स्वरूपाचे जलाशय उपलब्ध आहे मत्स्योत्पादनाला मोठी संधी आहे. राजस्थानसारख्या वाळवंटातून जर वर्षाकाठी २००० कोटींची निर्यात होऊ शकत असेल तर विदर्भातून ५० हजार कोटींची निर्यात शक्य आहे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी केले.
नागपूर : विदर्भात खारे गोडे दोन्ही स्वरूपाचे जलाशय उपलब्ध आहे मत्स्योत्पादनाला मोठी संधी आहे. राजस्थानसारख्या वाळवंटातून जर वर्षाकाठी २००० कोटींची निर्यात होऊ शकत असेल तर विदर्भातून ५० हजार कोटींची निर्यात शक्य आहे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी केले.
असोसिएशन फॉर इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट (एड) तर्फे आयोजित आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या खासदार औद्योगिक महोत्सव-अॅडव्हांटेज विदर्भच्या तिसऱ्या दिवशी मत्स्योत्पादनावर विशेष चर्चासत्र झाले. यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी बोलत होते. व्यासपीठावर मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त रवींद्र वायडा, मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त पुल्केश कदम, प्रादेशिक उपआयुक्त सुनील जांभुळे, सीआयएफईच्या प्राध्यापिका अर्पिता शर्मा, एटूएसटू एंटरप्रायजेसचे सहसंस्थापक अमोल साळगावकर, एमएम फिश सीड कल्टिव्हेशन प्रा. लिमिटेडचे संचालक सुखदेव मंडल, ऑस टेक इंडस्ट्रिज प्रा. लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विक्रम देशमुख यांची उपस्थिती होती
Previous Story Next Story